Home टॉप स्टोरी एकत्र निवडणुकांना राष्ट्रपती अनुकूल

एकत्र निवडणुकांना राष्ट्रपती अनुकूल

0

देशभरात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुका एकत्र घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही अनुकूलता दर्शवली. 

नवी दिल्ली- देशभरात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुका एकत्र घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही अनुकूलता दर्शवली. यामुळे या एकत्रित निवडणुका घेण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास मोठे बळ मिळाले आहे.

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे शिक्षकाच्या भूमिकेत शिरले. येथील डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयात त्यांनी ६० विद्यार्थ्यांचा तास घेतला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

११ वीच्या विद्यार्थ्यांने एकत्रित निवडणुका घेणे योग्य ठरेल काय ? असा प्रश्न विचारला त्यावर राष्ट्रपती म्हणाले की, निवडणूक आयोगाने ही कल्पना मांडली आहे. एकत्रित निवडणुका घेण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version