Home टॉप स्टोरी उत्तरप्रदेश विधानसभेत सापडली स्फोटके

उत्तरप्रदेश विधानसभेत सापडली स्फोटके

0

उत्तरप्रदेश विधानसभेत आमदाराच्या आसनाखाली भयानक स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उत्तरप्रदेश- उत्तरप्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.  दरम्यान,  सुरक्षेबाबत दिरंगाई झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत बुधवारी समाजवादी पक्षाच्या आमदाराच्या आसनाखाली एका पाकिटामध्ये ही स्फोटक पदार्थ सापडली होती. या घटनेने एकच खळबळ माजली होती. सुरक्षा कवच भेदून स्फोटक पदार्थ विधानसभेच्या आतमध्ये कसे आले, असा सवाल उपस्थित होता आहे.

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात या स्फोटक पदार्थाचे नाव पीइटीएन (PETN) असल्याचे निष्पन्न झाले आहे. १५० ग्रॅम पीईटीएन सापडले असून संपूर्ण विधानसभा स्फोटात उडवण्यासाठी ५०० ग्रॅम पीईटीएनची गरज असते. विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडणे हा गंभीर प्रकार आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. एनआयएमार्फतच याची चौकशी झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

सुरक्षेसाठी नव्याने नियमावली तयार करण्याची गरज असून सुरक्षा तपासणीदरम्यान प्रत्येक आमदाराने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version