Home महामुंबई ठाणे पालघरमधील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे यश

पालघरमधील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे यश

0

तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर मोठय़ा जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.

पालघर- तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर मोठय़ा जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर थोडय़ा प्रमाणात बाचाबाची प्रकार झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामध्ये बहुजन विकास आघाडी ९, शिवसेना ७ तर भाजपने २ ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. तर अन्य ग्रामपंचायती ग्राम परिवर्तन विविध आघाडय़ांनी लढविल्या होत्या.

तालुक्यातील सातपाटी, नवी दापचरी, कर्दळ, माकणे, साखरे, आगरवाडी, करळगाव, पाम, टेम्भी, गुंदले, कोकनेर, बहाडोली, पोळे, धनसार, विळगी, विराथन खुर्द, काटाळे, पोफरण, उसरणी, नांदगावतर्फे मनोर, कोरे, खर्डी, कोसबाड, गिरणोली, धुकटन, डोंगरे, चहाडे, नानिवली, पथराळी, खामलोली, नावझे, लोवरे, अक्करपट्टी अशा एकूण ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नानिवली, काटाळे आणि गिरणोली या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर कोसबाड ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली. कर्दळ, कोसबाड, पोफरण साखरे, नानिवली, काटाळे या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले. तर अक्करपट्टी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. सोमवारी एकूण २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. (मंगळवारी) सकाळी १० वाजता आर्यन शाळेत मतमोजणीला सुरुवात झाली.

तालुक्यातील गिरणोली, धुकटन, कर्दळ, खार्डी, कोकणेर, कोरे, लोवरे, माकने, विलंगी या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला. तर धनसार, डोंगरे, गुंदले, खामलोली, नावझे, पोफरण, विराथन खुर्द ह्या सात ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी केला आहे. भाजपने बहाडोली व नवी दापचरी ग्रामपंचायतीवर सरपंचांचा दावा केला आहे. तर अन्य ग्रामपंचायती पैकी सातपाटी ग्रा. पं. वर एकता विकास मंच, आगरवाडी-काँग्रेस, बविआ, राष्ट्रवादी आघाडी, चहाडे-परिवर्तन पॅनल, नांदगावतर्फे मनोर -अपक्ष, पाम-अपक्ष, साखरे-बिनविरोध, टेम्भी-अपक्ष, उसरणी-ग्राम विकास पॅनल, करळ गाव-अपक्ष असे सरपंच निवडून आले आहेत.

गाव आणि सरपंच पुढीलप्रमाणे :
पंढरी विष्णू जाधव- गिरणोली, वृशाली विकास गावड- आगरवाडी, वत्सला वसंत माळी- चहाडे, राजेंद्र घरत- धनसार, प्रसाद गोपीनाथ भोईर- धुकटन, वैभव पाटील- डोंगरे, रंजना कुंभारे- गुंदले, शुभांगी सुभाष डगला- खामलोली, राजेश घरत- खार्डी, किशोर अंतु खडके- कोकणेर, प्राजक्ता तांडेल- कोरे, चेतना चिंतामण तांडेल- लोवरे, रोहीनी शेलार- माकणे, पवन सवरा- नांदगाव तर्फे मनोर, साधना कुष्णा सुतार- नवी दापचरी, विद्या विजय लाबड- नावझे, प्रभाकर पिंपळे- पाम, मनीषा कौशिक पाटील- पोफरण, अरविंद सखाराम पाटील- सातपाटी, सुरेश पाटील- टेंभी, हरेंद्र रमाकांत पाटील- उसरणी, स्वाती श्रीधर पाटील- विलंगी, राजश्री सदानंद किणी- विराधन खुर्द, कौतुक वायडा- करळगाव, सुनिल गजिनाथ गुहे- नानिवली, दर्शना दुर्वास डुकले- काटाळे.

[EPSB]

वसईत परिवर्तन पॅनेलचे ७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

वसई तालुक्यातील सात ग्रामपंचायतींवर परिवर्तन पॅनेलने वर्चस्व दाखविले असून बविआला कोंडीत पकडण्यासाठी कॉँग्रेस, शिवसेना, भाजप व श्रमजीवी संघटनांनी मिळून परिवर्तन पॅनेल स्थापन केले होते.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version