Home देश इस्राईलच्या नॅचरल गॅसवर भारताची बोली

इस्राईलच्या नॅचरल गॅसवर भारताची बोली

0

इस्राईलमधील नैसर्गिक वायूंच्या साठय़ांसाठी भारतातील ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) बोली लावणार आहे.

नवी दिल्ली- इस्राईलमधील नैसर्गिक वायूंच्या साठय़ांसाठी भारतातील ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) बोली लावणार आहे. जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्राईल दौ-यानंतर दोन्ही देशांमध्ये हा महत्त्वपूर्ण करार ठरू शकतो. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इस्राईलमधील नैसर्गिक वायूसाठय़ांविषयी भाष्य केले.

बहुसंख्य आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या इस्राईलमधील नैसर्गिक वायूसाठय़ांच्या बोलीकडे पाठ फिरवतात. इस्राईलमध्ये पाऊल टाकल्यास या क्षेत्रात वर्चस्व असलेले अरब राष्ट्र नाराज होतील, असे या कंपन्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण ठरते. इस्राईलच्या सागरी क्षेत्रातील नैसर्गिक वायूसाठय़ासाठी ओएनजीसी बोली लावणार, असे त्यांनी म्हटले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयातील अधिका-यांचे एक पथक इस्राईलच्या दौ-यावर गेले होते. भूमध्य सागरात है नैसर्गिक वायूंचे साठे आहेत. भारताच्या शिष्टमंडळाने याची पाहणी केली. तसेच लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली. यासंदर्भात शिष्टमंडळाने इस्राईलमधील अधिका-यांशी चचार्देखील केली आहे. मोदी यांनी जुलैमध्ये इस्राईलचा दौरा केला होता. संरक्षण क्षेत्रात इस्राईल आणि भारत या देशांचे चांगले संबंध होते. मात्र, तंत्रज्ञान, तेल, ऊर्जा या क्षेत्रातील व्यापारी संबंध सुधारण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे.

[EPSB]

गुजरात दौ-यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version