Home देश लोकशाही जपा; ओबामांचे ट्रम्पंना पत्र

लोकशाही जपा; ओबामांचे ट्रम्पंना पत्र

0

अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ‘ओव्हल ऑफिस’च्या परंपरेचे पालन करताना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यासाठी एक खासगी पत्र लिहिले होते.

नवी दिल्ली – अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ‘ओव्हल ऑफिस’च्या परंपरेचे पालन करताना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यासाठी एक खासगी पत्र लिहिले होते. या पत्राचा अधिकृत ताबा सीएनएन या माध्यम समूहाला मिळाला असून त्यांनी ते सार्वजनिक केले आहे. या पत्रात ओबामांनी ट्रम्प यांना अमेरिकेन लोकशाही जपण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय असणारे ओव्हल ऑफिस सोडताना ओबामा यांनी आपल्या ‘रिसॉल्यूट डेस्क’च्या अगदी वरच्या ड्रॉवरमध्ये ट्रम्प यांच्यासाठी हे पत्र ठेवले होते. या पत्राबद्दल ट्रम्प यांनी मधल्या काळात भाष्यही केले होते. पत्रकारांना या पत्राचा ताबा कधीही मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता ‘सीएनएन’ माध्यमसमूहाला या पत्राचा ताबा मिळाला असून त्यांनी हे पत्र पहिल्यांदाच सार्वजनिक केले आहे.

[EPSB]

उत्तर प्रदेशात ऑक्सिजनअभावी आणखी ४९ मुले दगावली

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या (बीआरडी) रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे तब्बल ७० बालकांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता हा प्रश्न केवळ बीआरडी रुग्णालयापुरताच मर्यादित नसल्याचे दिसते.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version