Home महामुंबई नोटाबंदी हे सरकारचे अपयश : मुणगेकर

नोटाबंदी हे सरकारचे अपयश : मुणगेकर

0

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या १५ लाख ४५ हजार कोटी रकमेच्या नोटा चलनातून काढून घेण्याचे जे दुष्परिणाम उघड झाले आहेत.

मुंबई- पाचशे आणि एक हजार रुपयांच्या १५ लाख ४५ हजार कोटी रकमेच्या नोटा चलनातून काढून घेण्याचे जे दुष्परिणाम उघड झाले आहेत. त्यावरून नोटाबंदीचा मोदी सरकारचा निर्णय हे खूप मोठे अपयश ठरल्याचे सिद्ध झाल्याचे परखड मत माजी राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले आहे. लोकांकडे असलेल्या रोख रकमेपैकी ९९ टक्के रक्कम बँकेत जमा झाल्यामुळे काळा पैसा बाहेर काढण्याचा उद्देश पूर्णपणे फसला आहे.

त्याचप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितल्याप्रमाणे फक्त ४१ कोटींच्या बनावट नोटा सापडल्यामुळे अर्थव्यवस्थेत सुमारे चार ते पाच लाख कोटी रुपये हे बनावट चलन असल्याचा व ते दहशतवादी कारवायांसाठी वापरले जात असल्याचा सरकारचा होराही निष्फळ ठरला आहे. उलट या सर्व प्रक्रियेत सुमारे तीन लाख कोटी रुपयांचे काळे धन ‘पांढरे’ करण्याची संधी संबंधितांना मोदी सरकारने दिली, अशी टीकाही मुणगेकर यांनी केली. अर्थमंत्री अरुण जेटली हे रोखीचा कमी वापर, उत्पन्नावरील करदात्यांच्या संख्येत वाढ या बाबींच्या आधारे नोटाबंदीच्या निर्णयाचे अजूनही सर्मथन करीत आहे. मुळात पंतप्रधान मोदी यांनी अर्थमंत्री म्हणून जेटली यांना या निर्णयाविषयी विचारले देखील नसण्याचीच शक्यता जास्त आहे. हा एक प्रकारचा अपमानच आहे, असा निशाणाही मुणगेकर यांनी साधला.

[EPSB]

महाराष्ट्रात धोका असल्याचा अबू सालेमचा दावा

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी अबू सालेमने महाराष्ट्रात धोका असल्याचा दावा केला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version