Home टॉप स्टोरी राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता!

राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता!

0

बेकायदेशीर मोर्चा काढल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करावी की स्थितीचे गांभीर्य राखून अटकेऐवजी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई करावी, या संभ्रमात मुंबई पोलीस आहेत.

मुंबई- बेकायदेशीर मोर्चा काढल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करावी की स्थितीचे गांभीर्य राखून अटकेऐवजी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई करावी, या संभ्रमात मुंबई पोलीस आहेत.

एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरमनसे आज मुंबईत संताप मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी मनसे कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्टेशनपर्यंत हा मोर्चा जाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईत केवळ आझाद मैदानात मोर्चा आणि आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाला अनुसरून पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच रेल्वेच्या पश्चिम विभागीय मुख्य व्यवस्थापकांना भेटल्यानंतर राज ठाकरे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार आहेत.

मुंबई पोलीस यासंदर्भात कारवाई करण्याच्या तयारीत असून राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. या स्थितीचे गांभीर्य राखून अटकेऐवजी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई देखील होऊ शकते, असे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.

[EPSB]

पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम असून हा मोर्चा मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version