Home महामुंबई नितेश राणे यांच्या खड्डे छायाचित्र प्रदर्शनावर स्थायी समितीत फोकस

नितेश राणे यांच्या खड्डे छायाचित्र प्रदर्शनावर स्थायी समितीत फोकस

0

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांची छायाचित्रे काढून त्यांचे प्रदर्शन भरवून एक प्रकारे पालिकेतील शिवसेना-भाजपाचे पितळ उघडे करणा-या काँग्रेसचे युवा आमदार नितेश राणे यांच्या या प्रदर्शनाची दखल स्थायी समितीलाही घ्यावी लागली आहे.

मुंबई- मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांची छायाचित्रे काढून त्यांचे प्रदर्शन भरवून एक प्रकारे पालिकेतील शिवसेना-भाजपाचे पितळ उघडे करणा-या काँग्रेसचे युवा आमदार नितेश राणे यांच्या या प्रदर्शनाची दखल स्थायी समितीलाही घ्यावी लागली आहे.

महापौरांसह मुंबईतील १००हून अधिक नगरसेवकांच्या विभागातील रस्त्यांवरील खड्डे छायाचित्रांच्या अभिनव प्रदर्शनाची चर्चा मुंबईत असताना मंगळवारी स्थायी समितीत यावरून चर्चा झाली.

स्थायी समितीच्या बैठकीतच भाजपाचे दिलीप पटेल यांनी या प्रदर्शनाचा उल्लेख करत महापौरांचा विभागातच जर खड्डे असतील व ते बुजवले जात नसतील तर ती बाब गंभीर असल्याचे सांगितले.

स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा नगरसेवक दिलीप पटेल यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे मुंबईतील खड्डयांबाबत चिंता व्यक्त केली. भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी पूर्व उपनगरातील खड्डयांची आपल्याला छायाचित्रे दिली. त्याबरोबरच आमदार नितेश राणे यांनी खड्डयांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते.

या प्रदर्शनात त्यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या विभागातील रस्त्यांवरील खड्डे दाखवले होते. या खड्डयांची समस्या गंभीर असूनही प्रशासन ते गंभीरतेने घेत नाही. त्यामुळे मागील दोन ते तीन वर्षात किती रस्त्यांच्या कामांना परवानगी दिली आहे, किती रस्त्यांची कामे दिलेली आहेत, त्यांचा हमी कालावधी काय आहे, असे स्पष्ट करत जर आपण ७०० ते ८०० कि.मी. लांबीचे रस्ते बनवले असतील तर मग त्याचा हमी कालावधी आहे.

या सर्वाची जबाबदारी कंत्राटदारांची आहे. त्याकरता कंत्राटदारांकडून हे खड्डे बुजवले गेले पाहिजे, असे पटेल यांनी स्पष्ट केले. खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही दर्जेदार नसल्याचेही न्यायालयाने म्हटले असल्याचे सांगत पटेल यांनी यासाठी टाईमबाँड कालावधी असावा, असे त्यांनी म्हटले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version