Home महाराष्ट्र विविध प्रश्नांसंदर्भात आम्ही नेरळकर उतरणार रस्त्यावर

विविध प्रश्नांसंदर्भात आम्ही नेरळकर उतरणार रस्त्यावर

0

नेरळ गावातील विविध प्रश्नांबाबत आम्ही नेरळकर या नावाखाली उपोषण केले जाणार आहे.

नेरळ- नेरळ गावातील विविध प्रश्नांबाबत आम्ही नेरळकर या नावाखाली उपोषण केले जाणार आहे. नेरळ गावातील प्राथमिक शाळेची इमारत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधी मधून करण्यात येत असलेला रस्ता आणि रहिवाशांना होत असलेला कमी दाबाने पाणी पुरवठा या विषयी उपोषण केले जाणार आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तीन राजकीय पक्षाबरोबर आम्ही नेरळकर म्हणून ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरणार आहेत.

नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेची कुंभारआळी येथील इमारत पाडण्यात आली असून ती इमारती तोडण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. त्याचवेळी त्या इमारतीचे साहित्य परस्पर विकून टाकण्यात आले आहे. नेरळ गावातील रस्त्यांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या निधी मधून रायगड जिल्हा परिषद करीत आहे. त्याबाबत सदर रस्त्यांची कामे नित्कृष्ट करण्यात आली असल्याचा आम्ही नेरळकर यांचा आरोप आहे.

तसेच गावातील रहिवाशांना गेली काही महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. गावाचे पाणी ग्रामपंचायत प्रशासनाने बिल्डर लॉबीला विकले असल्याचा आरोप केला आहे. या तीन प्रमुख विषयांवर आम्ही नेरळकर उपोषणाला बसणार आहेत. त्याचवेळी नेरळ गावात हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाप्रमाणे सुशोभित करण्याची मागणी आम्ही नेरळकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी देखील उपोषण केले जाणार आहे.

यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष अंकुश शेळके, कर्जत पंचायत समितीच्या सदस्या शिवसेनेच्या सुजाता मनवे, आरपीआयचे नेरळ अध्यक्ष मिलिंद किर्ते, मनसेचे नेरळ अध्यक्ष संकेत जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे केतन पोतदार, मीना पवार, माजी सदस्य सेनेचे जयवंत साळुंखे, तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यां वंदना गायकवाड, आरपीआय महिला अध्यक्ष सुरेखा कांबळे आदी उपोषण करणार आहेत.हे सर्व उपोषणाला बसण्याआधी नेरळ गावातून रॅली काढून शिवाजी महाराज चौकात पोहचणार असून त्या निमित्त नेरळ गावातील समस्यांना वाट मोकळी होणार आहे.

[EPSB]

पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिन्स्टन रोड स्थानकात शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी नायगाव स्थानकात प्रवाशांनी केलेल्या आंदोलनाच्या चेंगराचेंगरीत एक तरुणी बेशुद्ध पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version