Home देश मोदींच्या सभेसाठी आधारची सक्ती

मोदींच्या सभेसाठी आधारची सक्ती

0

देशातील अनेक सेवासुविधांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही आधारची सक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- देशातील अनेक सेवासुविधांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही आधारची सक्ती करण्यात आली आहे. पटना विद्यापीठातील मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पीएचडी करणा-यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ‘द टेलिग्राफ’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. शनिवारी पंतप्रधान मोदी पटना विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

याआधी इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सने रुग्णांना दाखल करून घेताना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. याच पार्श्वभूमीवर पटना विद्यापीठानेही मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार कार्डची सक्ती केली आहे. याबद्दल माहिती देताना, जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमात सहभागी होणा-यांची संख्या मर्यादित असावी, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचे विद्यापीठाच्या उपकुलगुरू डॉली सिन्हांनी दिली. या कार्यक्रमाला केवळ पदव्युत्तर शिक्षण घेणारे

आणि पीएचडी करणारे विद्यार्थीच उपस्थित राहू शकतात. त्यासाठीही त्यांना आधार कार्ड दाखवावे लागेल. विद्यार्थी संघटनेशी संबंधित असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींसमोर एखादा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून ही काळजी घेतली जात आहे. याशिवाय पदवीचे शिक्षण घेणा-या मर्यादित विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी एनसीसी किंवा एनएसएसशी संबंधित असल्यास त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल.

विद्यापीठाच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मोहम्मद तमन्ना या विद्यार्थीनीने आनंद व्यक्त केला. ‘आमच्या विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्याने अतिशय आनंद झाला आहे,’ असे तमन्नाने सांगितले. मात्र या कार्यक्रमाला मर्यादित विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याने तिने नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला मोदींसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद उपस्थित राहणार आहेत.

[EPSB]

अभिनेते अनुपम खेर यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version