Home महामुंबई नांदेडच्या निवडणुकीत भाजपने मोपलवारांचे ३०० कोटी वापरले

नांदेडच्या निवडणुकीत भाजपने मोपलवारांचे ३०० कोटी वापरले

0

नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत सपाटून मार खाव्या लागणा-या भाजपवर आता विरोधक तुटून पडले आहेत.

मुंबई- नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत सपाटून मार खाव्या लागणा-या भाजपवर आता विरोधक तुटून पडले आहेत. या पराजयामुळे भाजपचा अश्वमेधाचा वारू लंगडा झाला आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी भाजपवर एक गंभीर आरोप केला. नांदेडमध्ये भाजपच्या विजयासाठी राधेश्याम मोपलवार यांनी ३०० कोटी रुपये पुरवले.

भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणा-या प्रतापराव चिखलीकर यांच्या माध्यमातून हे पैसे वापरण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना समृद्धी महामार्ग प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांमुळे पदावरून पायउतार व्हावे लागले होते. सध्या त्यांची या प्रकरणी चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीवर प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिणीचे जावई असलेले आयपीएस अधिकारी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

त्यामुळेच भाजपशी जवळीक असलेल्या मोपलवार यांना क्लीनचिट मिळेल, अशी चर्चा आहे. या मोबदल्यात मोपलावर यांनी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला ३०० कोटी रुपये पुरवले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे सर्वप्रथम प्रवीण पडवळ यांना समितीवरून हटवण्यात यावे. त्याऐवजी न्यायालयीन समितीकडून मोपलवारांची चौकशी व्हावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. दौ-यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी या निकालानंतर नांदेडच्या जनतेचे खुल्या मनानं अभिनंदन करावे, अशी उपरोधिक टीकाही मलिक यांनी केली. पार्टी विथ डिफरन्स सांगणारा पक्ष सगळ्या पद्धतीने निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र नांदेडच्या जनतेने भाजपाला नकार दिला. यावरूनच देशातील वातावरण बदलत असल्याचे दिसत आहे, असेही मलिक म्हणाले.

[EPSB]

एकूण लोकसंख्येपैकी ३१ टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. ‘लीब्रेट’ या डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्लागार संस्थेने हा सव्‍‌र्हे केला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version