Home महामुंबई मुंबई पोलिसांनी गँगस्टर डी. के. रावच्या मुसक्या आवळल्या!

मुंबई पोलिसांनी गँगस्टर डी. के. रावच्या मुसक्या आवळल्या!

0

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव याला अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी. के. राववर अटकेची कारवाई केली.

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव याला अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी. के. राववर अटकेची कारवाई केली. अँटॉप हिलच्या एसआरए कन्सल्टंटला धमकावून ५० लाखांची मागणी डी. के. रावने केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरच्या अटकेनंतर आता डी. के. रावच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. डी. के. रावचा अधिकाधिक कालावधी तुरुंगातच गेला असून, २०१६ साली तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. डी. के. रावचं मूळ नाव रवी मल्लेश वोरा आहे. काही वर्षापूर्वी इन्स्पेक्टर मदुला लाड यांच्यासोबतच्या चकमकीत डी. के. राव जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या खिशात बँकेचे बनावट आयकार्ड मिळाले होते. त्यावरील नाव डी. के. राव असे होते. तेव्हापासून तो डी. के. राव या नावानेच अंडरवल्र्डमध्ये ओळखला जातो.

मुंबई क्रिकेट क्लबला उपविजेतेपद

चार देशांच्या पाचव्या टून अहमद सरर्जी चषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या मुंबई क्रिकेट क्लबने उपविजेतेपद मिळवले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version