Home टॉप स्टोरी मोदी विचारतात, ‘भ्रष्टाचार हवा की मोदी’

मोदी विचारतात, ‘भ्रष्टाचार हवा की मोदी’

0
Narendra Modi

‘मी, भष्टाचार हटवण्यासाठीच सत्तेत आहे. मात्र विरोधक मला हटवण्यासाठी झटत आहेत’, असे नेहमीचे बोलबच्चन झाडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला विकासाचे गाजर दाखवले.

लखनऊ- ‘मी, भष्टाचार हटवण्यासाठीच सत्तेत आहे. मात्र विरोधक मला हटवण्यासाठी झटत आहेत’, असे नेहमीचे बोलबच्चन झाडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला विकासाचे गाजर दाखवले.

लखनऊ येथे सोमवारी आयोजित जाहीर सभेत काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बसपाला भ्रष्ट ठरवून स्वत: नामानिराळे राहण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र सहारा डायरीतील नोंदीनुसार गुजरात निवडणुकीच्या वेळी मोदींनी सहारा समूहाकडून घेतलेल्या ४२ कोटी रुपयांवर चकार शब्दही त्यांनी काढला नाही.

विरोधक आपणाला हटवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण देशातील जनता सुज्ञ आहे. त्यांना विकासाचे जीवन हवे आहे, ही इच्छा फक्त आपला पक्षच पूर्ण करू शकतो, अशी टेप लावून ‘सबका साथ, सबका विकासचा जुनाच नारा त्यांनी दिला. १४ वर्षानंतर उत्तर प्रदेशातील भाजपाचा वनवास संपेल, असे एका वृत्तवाहिनीवर आपण पाहत होतो.

मात्र मला भाजपाच्या वनवासावर नाही तर उत्तर प्रदेशाच्या विकासावरच बोलायचे आहे, अशी भावनिक गळ उत्तर प्रदेशातील मतदारांना त्यांनी घातली. आपली लढाई भ्रष्टाचार व काळया पैशांविरोधात आहे. मात्र विरोधकांनी मला हटवण्याची तयारी चालवली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे आपण पाहिले आहे. पण, समाजवादी पक्ष आणि बसपाला कधी एकत्र पाहिले आहे का? ‘सपाचा माणूस म्हणेल की सूर्य उगवतो आहे तर बसपाचा माणूस म्हणेल की सूर्य मावळतो आहे’ मात्र इतक्या दिवसांनंतर भाजपाविरोधात हे दोन्ही पक्ष एकवटले आहेत.

त्यांच्या अंजेडयावर मोदी हटाओ आहे, मात्र आपल्या अंजेडयावर काळा पैसा आणि भ्रष्टाचार हटाओ आहे, अशी टीका करताना आपला भाजपा भ्रष्टाचारापासून कसा नामानिराळा आहे, हे सांगण्याची धडपड त्यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version