Home टॉप स्टोरी मनसेच्या संताप मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनसेच्या संताप मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘संताप मोर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘संताप मोर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि मुंबईकरांनी पाठींबा दिल्याने चर्चगेट परिसर गर्दीने फुलून गेला.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘संताप मोर्चा’ला मेट्रो जंक्शन येथून सुरुवात झाली. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरी मोर्चाच्या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आंदोलक ‘कशाला हवी बुलेट ट्रेन, नियमित करा लोकल ट्रेन’ अशी घोषणा देत होते.

मुंबईकरांचा रोजचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी हा मोर्चा मेट्रो जंक्शन येथून सुरू झाला आणि तो चर्चगेट स्थानकाजवळच्या पश्चिम रेल्वेचे मुख्यालय येथे पोहचला. राज ठाकरे आणि त्यांचे शिष्टमंडळ यांनी रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले.

आता चर्चगेट स्थानकाबाहेर राज ठाकरे उपस्थितांना जाहीर सभेतून मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या मोर्चाला मराठी कलाकारांनी पाठींबा दिला. तसेच या मोर्चात राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमितही सहभागी झाले. राज्याच्या विविध भागामधून कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. पालघर, डहाणू परिसरातून आलेले आदिवासी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या मोर्चात मोदी सरकार आणि बुलेट ट्रेनचा निषेध करण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली.

मेट्रो जंक्शनपासून ते थेट चर्चगेट स्थानकापर्यंत सर्वत्र पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात केल्याने परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.

[EPSB]

पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम असून हा मोर्चा मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.


राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता!

बेकायदेशीर मोर्चा काढल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करावी की स्थितीचे गांभीर्य राखून अटकेऐवजी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई करावी, या संभ्रमात मुंबई पोलीस आहेत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version