Home महामुंबई अखेर म्हाडाच्या घरांना ओसी

अखेर म्हाडाच्या घरांना ओसी

0

मालाड मालवणीमधील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटासाठी बांधलेल्या म्हाडाच्या घरांना अखेर ओसी मिळाली आहे.
मुंबई- मालाड मालवणीमधील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटासाठी बांधलेल्या म्हाडाच्या घरांना अखेर ओसी मिळाली आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्य लॉटरी विजेत्यांना लवकरच घरांचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.म्हाडाने २०१५मध्ये मालाड मालवणीमधील घरांची लॉटरी काढली होती. लॉटरी विजेत्यांनी घरांचे संपूर्ण पैसे भरल्यानंतरही गेल्या दोन वर्षांपासून हक्काच्या घरांचा ताबा विजेत्यांना मिळाला नव्हता. त्यामुळे लॉटरी विजेते हतबल झाले होते. अखेर या घरांना महापालिकेची ओसी मिळाली आहे. त्यामुळे या विजेत्यांना घरांचा ताबा लवकरच मिळणार आहे.

काही घरांना ओसी मिळाली आहे. पण मागील दोन वर्षे घरांचा ताबा नसतानाही बँकेतून आमच्या कर्जाचे हप्ते कापले जात होते. हक्काचे घर लागूनही काही लॉटरी विजेते भाड्याच्या घरात राहात होते. त्यामुळे आम्ही म्हाडाकडे नुकसान भरपाई मागितली आहे. म्हाडाने आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटासाठी मालाड मालवणीमध्ये म्हाडाने पाच इमारती बांधल्या. या घरांसाठी लॉटरी काढली. लॉटरी विजेत्यांनी गृहकर्ज काढून घरांचे पैसे भरले पण घरांना ओसी नसल्याने प्रत्यक्षात घरांचा ताबा मिळत नव्हता.

या लॉटरी विजेत्यांचे बँकेतून कजार्चे हप्तेही कापले जात होते. या विजेत्यांनी म्हाडाकडे वारंवार पाठपुरावा केला. पण त्यांना यश मिळत नव्हते. प्रत्येक वेळी त्यांच्यावर आश्वासनांची खैरात सुरू होती.या इमारतींमधील २३२ पैकी १६४ घरांना पालिकेची ओसी मिळाली आहे. उर्वरित घरांना ओसी अजूनही मिळालेली नाही. पण म्हाडाच्या अधिका-यांच्या मते आता उर्वरित घरांना ओसी मिळण्यात फारशी अडचण येणार नाही. पुढील आठवडय़ात उर्वरित घरांनाही ओसी मिळेल. या विजेत्यांना लवकरच घरांचा ताबा दिला जाईल.

[EPSB]

‘आमच्या देशातून दहशतवादी संघटना सक्रीय होतात’

दहशतवादी कारवायांना सतत पाठिशी घालणा-या पाकिस्तानने पहिल्यांदाच दहशतवादी संघटना आमच्याच धर्तीवर सक्रीय होत असल्याची कबुली दिली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version