Home महामुंबई मेट्रो वेळेआधीच सुरू होईल- मुख्यमंत्री

मेट्रो वेळेआधीच सुरू होईल- मुख्यमंत्री

0

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७ आणि दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-२ या दोन्ही मार्गांचे काम वेगाने सुरू असून हे दोन्ही मार्ग नियोजित वेळेआधीच वाहतुकीसाठी सुरू होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई- अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७ आणि दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-२ या दोन्ही मार्गांचे काम वेगाने सुरू असून हे दोन्ही मार्ग नियोजित वेळेआधीच वाहतुकीसाठी सुरू होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीए मुख्यालयात एमएमआरडीए राबवत असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यात मेट्रो, शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक, मल्टीमोडल कॉरिडोर, काही रस्ते, उड्डाणपूल आदी प्रकल्पांचा समावेश होता.

या प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत आपण समाधानी असून या प्रकल्पांच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावेल, असे ते म्हणाले. प्रकल्प वेळेत पूर्ण करणे ही काळाची गरज असून प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याने त्या शहराचा कायापालट होतो. उपनगरीय रेल्वेतील वाढती गर्दी आणि रोज घडणा-या अपघातांची संख्या पाहता मेट्रो ही काळाची गरज बनली आहे. पायाभूत सुविधांच्या अपयशामुळे मानवी जीवनाचा होणारा अंत कधीही माफ करता येण्याजोगा नाही, अशा शब्दांत त्यांनी पायाभूत सुविधा झपाटय़ाने उभारण्यावर भर दिला.

मेट्रो- २ आणि मेट्रो-७चे काम ज्या वेगाने सुरू आहे, त्याच वेगाने अन्य मेट्रो मार्गाचे कामही वेगाने करून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी, अशी सूचना त्यांनी केली. या प्रकल्पांच्या कामामुळे आज काही प्रमाणात गैरसोय होत असली, तरी ती तात्पुरत्या स्वरूपात आहे. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवास सुखकर होणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, वडाळा ते जेकब सर्कल हा मोनोचा दुसरा टप्पा डिसेंबर २०१७ मध्ये सुरू होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील नियोजित स्मारकाच्या कामाची वर्क ऑर्डर नोव्हेंबर महिन्यात निघणार आहे.

एकात्मिक तिकीट प्रणाली वर्षअखेपर्यंत?
सर्व प्रकारच्या वाहतूक सेवेसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली व्यवस्था या वर्षअखेरपयर्ंत सुरू करावी, अशीही सूचना त्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरार-अलिबाग बहुद्देशीय प्रकल्पाचा आढावा घेता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाचीही माहितीही त्यांनी घेतली. या बैठकीत विविध प्रकल्पांच्या १०५ स्लाइड मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आल्या.

[EPSB]

पुण्याचा प्रशासकीय कारभार उत्तम पद्धतीने सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारभाराची गती उत्तम आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version