Home महाराष्ट्र कोकण मेवा माथेरानच्या रानवाटा निसर्ग पर्यटनाचा समृद्ध अनुभव

माथेरानच्या रानवाटा निसर्ग पर्यटनाचा समृद्ध अनुभव

0

माथेरान म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा अलौकिक ठेवा. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. एक- दोन वेळा माथेरानला जाऊन आल्यानंतर पुन्हा माथेरानला कशासाठी जावे, असा जर प्रश्न पडला असेल तर माथेरानच्या रानवाटा तुडवत माथेरान पाहण्याचा अनोखा आनंद घ्यायला, हेच उत्तर आहे. 

माथेरान म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा अलौकिक ठेवा. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. एक- दोन वेळा माथेरानला जाऊन आल्यानंतर पुन्हा माथेरानला कशासाठी जावे, असा जर प्रश्न पडला असेल तर माथेरानच्या रानवाटा तुडवत माथेरान पाहण्याचा अनोखा आनंद घ्यायला, हेच उत्तर आहे. माथेरानचे जंगल जैव विविधतेने संपन्न आहे. माथेरानच्या डोंगर द-यातून ट्रेक करताना याचा अनुभव येईल. डोंगर द-यांमधून कोसळणारे धबधबे, झ-याचे मंजूळ संगीत, हे सारे माथेरानचे निसर्ग वैभव आहे.

ट्रेकिंग करताना महत्त्वाच्या सूचना

या रानवाटांची स्थानिकांकडून किंवा अनुभवी ट्रेकर्सकडून माहिती घ्यावी. अनुभवी अथवा वाटाडय़ा सोबत ठेवावा. पायात बूट, पूर्ण कपडे परिधान करावे. पाण्याची बाटली, आवश्यक प्रथोमोपचार साहित्य सोबत ठेवावे. नियोजित ट्रेकला किती कालावधी लागेल याचा अंदाज घेऊन सोबत खाण्याचे साहित्य ठेवावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नये.

वन ट्री हिल वाट

माथेरानच्या वन ट्री हिल पॉइंटच्या घळीतून ही वाट वर येते. पायथ्याला आंबेवाडी गाव, याची समुद्रसपाटीपासून उंची १८० मीटर, कर्जतपासून जवळपास २३ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

सहा आसनी रिक्षाने येथे पोहोचता येते. सर्वसाधारण व्यक्ती या मार्गाने ट्रेकिंग करत माथेरान गाठू शकतो. आंबेवाडीतून सोंडेवरून टप्प्याटप्प्याने चढणारी ही वाट ५०० मीटर चढल्यावर सपाटीवर येते. पुढील वाट खिडीतून आहे, त्यात पावसात ओहोळ वाहत असतात. शेवटच्या टप्यात असणा-या वन ट्री हिलवर पावसात चढणे टाळावे. निसरडय़ा वाटेमुळे अपघात होऊ शकतात.

पिसारनाथ शिडीची वाट

पायथ्याचे ठिकाण उंबरणेवाडी, समुद्रसपाटीपासून उंची १५० मीटर आहे. आंबेवाडीहून चालत दीड तास येथे पोहोचण्यासाठी लागतात. या ट्रेकला जवळपास तीस तास लागतात. उंबरण्यातून चढाचीही वाट आहे. वाटेत एक लोखंडी शिडी आहे. वाटेत गुहेत पिसारनाथाचे मूळ स्थान आहे. शेवटचा टप्पा घळीतून आहे. त्याच्या सुरुातीला ओंडक्याची लाकडी शिडी आहे. ही वाट पावसाळ्यात बंद असते. अत्यंत कठीण अशी ही वाट आहे.

धोदानी हाशाचीपट्टी माथेरान

पनवेलपासून धोदानी वीस किलोमीटर अंतरावर असून पनवेलहून धोदानीपर्यंत वाहनाने अथवा एसटी बसने येता येते. पुढे चिंचवाडीतून पुढे तीव्र चढण वाट हाशाच्या पट्टीवर येते. हाशाची पट्टी ५०० मीटर उंचीवरील, ५० एक घरांची वस्ती आहे. पुढे पाय-यांची वाट माथेरानला येते. ट्रेकिंगसाठीही मध्यम स्वरूपाची वाट आहे.

धोदानी सनसेट पॉइंट

पनवेलहून वाहनाने किंवा एसटीने धोदानीपर्यंत आल्यानंतर तेथून एक वाट माथेरानच्या सन सेटपॉइंटपर्यंत जाते. धोदानी ते माथेरान दरम्यान आदिवासींची सातत्याने ये-जा असल्याने ही वाट अधिक मळलेली आहे. ट्रेकिंगसाठी अत्यंत सोपा मार्ग असून या माग्रे ट्रेकिंग करणा-यांची संख्या अधिक आहे.

विकटगड माथेरान

नेरळ हे येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक असून विकटगड या नावाने देखील हा किल्ला प्रसिद्ध आहे. ट्रेक करत येथे पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे. नेरळहून पेब किल्ला गाठावा. किल्याच्या दक्षिण बुरुजाकडे लोखंडी शिडी आहे. तिथून उतरून माथेरान पेब खिंडीत यावे.

येथून दक्षिणेकडे पुढे वाट नेरळ माथेरान रेल्वे रुळावर येते. येथेच अलीकडे दगडावर एक गणपतीचे शिल्प साकारले आहे. इथून रुळावरून चालत अमन लॉज स्थानक गाठता येते. मालडुंगे धोदानीच्या बाजूला आहे. येथून सुद्धा पेब किल्ल्यावर जाता येईल.

गारबट ट्रेक

मध्य रेल्वेच्या मार्गावरील भिवपुरी रेल्वे स्थानक हे या ट्रेकसाठी जवळचे रेल्वे स्थानक. येथून गारबट पॉइंट माथेरानच्या ट्रेकला सुरुवात करता येते. अत्यंत सोपा ट्रेक असला तरी आवश्यक काळजी घेणे जरुरी आहे. गारबट पॉइंटपासून दक्षिणेकडे सोन्डाई किल्ल्यापर्यंत पसरलेली ५०० मीटर उंचीची डोंगर सोंड आहे.

भिवपुरी स्थानकाच्या पश्चिमेकडे झालेल्या नवीन धरणाजवळून पुढे जाऊन या सोंडेवर चढता येते. सोंडेवर चढल्यावर उजवीकडे माथेरानच्या दिशेने मोर्चा वळवायचा. पुढे गारबट वाडीत न जाता गारबट पॉइंटकडे चढणा-या वाटेने वर जावे. तेथून माथेरान गाठायचे.

रामबाग पॉइंट

माथेरानच्या पूर्व भागात असलेली ही वाट आहे. माथेरानचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख होतो. ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर हे माथेरानला पहिल्यांदा वन ट्री हिल माग्रे आले. तर पुढील प्रवास त्यांनी रामबाग वाटेने केला. सहा आसनी रिक्षाने पोखर वाडीतून या मार्गे ट्रेकिंग करत माथेरानला येता येते.

माथेरानला जाणारी ही आणि एक सोपी वाट. पोखरवाडीतून चौकपॉइंटच्या खालून आरामात ही वाट चढता येते. शेवटी रामबाग जवळ आल्यावर ब-यापैकी दगडी पायवाट आहे. तसा हा सोपा ट्रेक आहे.

नेरळ-माथेरान

नेरळवरून माथेरानला येण्यासाठी वाहनाची सोय असली तरी येथून पायी चालत ट्रेकिंग करत येणा-या पर्यटकांची संख्या देखील अधिक आहे. नेरळहून रेल्वे रुळावरून अथवा गाडीरस्त्याने माथेरान गाठणारी मंडळी कमी नाहीत. या ट्रेकिंगसाठी टपालवाडी, ठाकूरवाडी, वाटरपॉइंप स्टेशन, धनगर टप्पा असा मार्ग आहेच.

चौक धोदानी वाजे

पनवेल धोदानी रस्त्यावरील वाजेपूर गावातून वाजे िखडीने तसेच धोधाने जवळच्या चिंचवाडी अथवा वाघाच्या वाडीतून म्हातारीच्या िखडीने उतरण्यात येता येते. चौक नानिवली आरकस वाडी उंबरणे अशी ही झाडीभरली वाट मोरबे धरणाच्या पश्चिमेकडून आहे. उंबरण्यातून शिडीने अथवा पट्टीने माथेरान गाठावे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version