Home महाराष्ट्र मंडणगडमधील १३ ग्रा.पं.साठी २१४ अर्ज दाखल

मंडणगडमधील १३ ग्रा.पं.साठी २१४ अर्ज दाखल

0

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर थेट सरपंच निवडीसाठी एकूण ५० नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात आली.

मंडणगड- तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर थेट सरपंच निवडीसाठी एकूण ५० नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात आली. निवडणूक होत असलेल्या ९ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या ७ व ४ ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ असल्याने ९० ग्रा. पं. सदस्यांची निवड होणार आहे. त्यामध्ये सरपंचाच्या रुपाने आणखी एक जागा वाढणार आहे.

ग्रा.पं. निहाय उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे
लोकरवण ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ तर सरपंच पदाकरिता ५ नामनिर्देशनपत्रे, ७ सदस्यांच्या अडखळ ग्रामपंचायतीत सदस्य निवडीसाठी १५ नामनिर्देशनपत्रे, तर सरपंच पदाकरिता २ नामनिर्देशनपत्रे आली आहेत. त्यामुळे येथे थेट लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. ७ सदस्यांच्या शिगवण ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी १३ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ४ नामनिर्देशनपत्रे, ९ सदस्यांच्या देव्हारे ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी २३ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ४ नामनिर्देशनपत्रे, ९ सदस्यांच्या वेसवी ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी २५ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ६ नामनिर्देशनपत्रे, ९ सदस्यांच्या बाणकोट ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी २८ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ३ नामनिर्देशनपत्रे.

७ सदस्यांच्या दहागाव ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी १२ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ७ नामनिर्देशनपत्रे, ७ सदस्यांच्या दुधेर-बामणघर ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी ८ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता २ नामनिर्देशनपत्रे, ७ सदस्यांच्या कुंबळे ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी १५ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ३ नामनिर्देशनपत्रे, ७ सदस्यांच्या पिंपळोली ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी १३ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ४ नामनिर्देशनपत्रे, ७ सदस्यांच्या तिडे-तळेघर ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी २१ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ४ नामनिर्देशनपत्रे, ७ सदस्यांच्या विन्हे ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी १३ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ३ नामनिर्देशनपत्रे, ं७ सदस्यांच्या मुरादपूर ग्रा. पं. सदस्य निवडीसाठी ९ नामनिर्देशनपत्रे तर सरपंच पदाकरिता ४ नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली आहेत.

[EPSB]

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारचे वाभाडे काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपची कोंडी करणारे वक्तव्य केले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version