Home टॉप स्टोरी विधानसभेत जीएसटी विधेयक एकमताने मंजूर

विधानसभेत जीएसटी विधेयक एकमताने मंजूर

0

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे.

मुंबई- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. जीएसटीवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. अखेर तिस-यादिवशी विधानसभेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

विधान परिषदेत हे विधेयक रविवारी मंजूर करण्यात आले होते. तीन दिवसीय विशेष अधिवेशनात अनेक सदस्यांनी आपआपली मते मांडली होती. जीएसटीच्या दरामध्ये समानता असायला पाहिजे, अशा सुचना सदस्यांनी केल्या.

राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पाच वर्षांत ५ लाख कोटी रुपयांचा महसूल जमा होऊन राज्याची आर्थिक स्थिती भक्कम राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देण्यास सक्षम असेल, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी चर्चेला उत्तर देताना दिली. या चर्चेनंतर हे विधेयक संमत करण्यात आले. त्याबरोबरच जीएसटी संदर्भातील तीन विधेयकही एकमताने मंजूर करण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version