Home देश लव्ह जिहाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

लव्ह जिहाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

0

केरळमधल्या एका लव्ह जिहाद प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

नवी दिल्ली- केरळमधल्या एका लव्ह जिहाद प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत असे म्हटले आहे. हादिया आणि शफीन जहान यांचा विवाह केरळ उच्च न्यायालयाने कलम २२६ अंतर्गत रद्द केला. या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ९ ऑक्टोबरला होणार आहे. 

मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात शफीन जहानने अखिला अशोकनबरोबर विवाह केला. अखिलाने इस्लाम धर्म स्वीकारून हादिया हे नाव धारण केल्यानंतर हा विवाह संपन्न झाला. या विवाहाविरोधात अखिलाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. माझ्या मुलीला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडला. तिला अफगाणिस्तान किंवा सिरियाला पाठवले जाऊ शकते असा आरोप त्यांनी याचिकेत केला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ऑगस्ट महिन्यापासून एनआयएने तपास सुरू केला.

सर्वोच्च न्यायालयाला एनआयएमार्फत तपास हवा असेल तर, आपली काही हरकत नाही असे केरळ सरकारने सांगितले. एनआयए आणि केरळ पोलिसांकडून तपासाची माहिती घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय अखिलाशी बोलणार आहे. एकूणच या संपूर्ण विषयावर अखिलाचे काय मत आहे ते जाणून घ्यायचे आहे.

[EPSB]

‘त्या’ कंपन्यांचा पीएफ सरकार भरणार

दरवर्षी २ कोटी नोक-या उपलब्ध करण्याचे आश्वासन देत मागील लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version