Home क्रीडा आयपीएल चुरशीच्या सामन्यात हैदराबादचा विजय

चुरशीच्या सामन्यात हैदराबादचा विजय

0

अखेरच्या षटकापर्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

मुंबई – अखेरच्या षटकापर्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत चार गडी बाद २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला १९४ धावा करता आल्या.

राजस्थानने ठेवलेल्या २०१ या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अडखळती झाली. यापूर्वींच्या सामन्यांमध्ये चमकदार खेळी करणारा सलामीवीर अजिंक्य रहाणे अवघ्या आठ धावा करुन बाद झाला. त्यानंतर वॉटसनही १२ धावांवर तंबूत परतला. स्टीव्हन स्मिथने एकाकी किल्ला लढवत ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र ही खेळी राजस्थानला विजयी पथावर नेऊ शकली नाही. राजस्थानच्या चार खेळाडूंना अवघी एक अंकी धावसंख्या करण्यात यश मिळाले.

जेम्स फॉकनरने ३० धावा करत संघाचा डाव सावरला. फॉकनर आणि स्मिथने सर्वाधिक ४४ धावांची भागीदारी केली. १८ वे षटक संपले असताना राजस्थानला १२ चेंडूत ४० धावांची गरज होती. यावेळी हैदराबादला विजय दृष्टिपथात आला होता. मात्र १९ व्या षटकात पी.कुमारने मॉरिसच्या गोलंदाजीवर तीन सलग षटकार ठोकले आणि राजस्थानच्या आशा पल्लवित केल्या. संपूर्ण षटक खेळून काढत कुमारने त्या षटकांत २२ धावा जमवल्या. अखेरच्या षटकांत त्यांना जिंकण्यासाठी १८ धावांची गरज होती.मात्र भुवनेश्वर कुमारने राजस्थानला संधीच दिली नाही आणि अखेर त्यांना अवघ्या सात धावांनी पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. सलामीवीर शिखर धवन आणि इयॉन मॉर्गनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

प्रथम फलंदाजी करणा-या हैदराबादने २० षटकांत चार गडी गमावत २०१ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर खेळणा-या मॉर्गनने केवळ २८ चेंडूत ६३ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. यात त्याने चार चौकार आणि पाच षटकारांची बरसात केली.

तर सलमीवीर शिखर धवनने ३५ चेंडूत जबरदस्त ५४ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. राजस्थानची सुरुवात चांगली झाली. संघाचे अर्धशतक पूर्ण होण्यासाठी दोन धावा बाकी असताना हैदराबादने डेविड वॉर्नरची विकेट गमावली. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर हेन्रिकने २० धावा केल्या. तर रवी बोपारा १७ धावांवर नाबाद राहिला.

राजस्थानकडून शेन वॉटसनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर फॉकनर आणि तांबे यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद – चार बाद २०१

राजस्थान रॉयल्स – सात बाद १९४

सामनावीर – इयॉन मॉर्गन(हैदराबाद)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version