Home क्रीडा कुलदीप, बुमराचा प्रभावी मारा

कुलदीप, बुमराचा प्रभावी मारा

0

पावसाने व्यत्यय आणलेल्या लढतीत शनिवारी ऑस्ट्रेलियावर नऊ विकेटनी मात भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ‘डकवर्थ लुईस पद्धती’च्या आधारे यजमानांसमोर ६ षटकांत ४८ धावांचे लक्ष्य होते. भारताने रोहित शर्माच्या बदल्यात  ५.३ षटकांत लक्ष्य पार केले.

रांची पावसाने व्यत्यय आणलेल्या लढतीत शनिवारी ऑस्ट्रेलियावर नऊ विकेटनी मात भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ‘डकवर्थ लुईस पद्धती’च्या आधारे यजमानांसमोर ६ षटकांत ४८ धावांचे लक्ष्य होते. भारताने रोहित शर्माच्या बदल्यात ५.३ षटकांत लक्ष्य पार केले. तत्पूर्वी, ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव आणि मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराने (प्रत्येकी २ विकेट) अचूक आणि प्रभावी मारा करताना ऑस्ट्रेलियाला १८.४ षटकांत ८ बाद ११८ धावांत रोखले.

माफक आव्हान असले तरी आघाडीच्या फळीने आक्रमक सुरुवात केली. रोहितने ७ चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारासह ११ धावा केल्या. वैयक्तिक पहिल्या आणि डावातील दुस-या षटकात रोहितची विकेट मिळवण्यात वेगवान गोलंदाज नॅथन कॉल्टर-नाईलला यश आले तरी डावखुरा सलामीवीर शिखर धवनसह विराट कोहलीने दुस-या विकेटसाठी ३८ धावांची नाबाद भागीदारी करताना भारताला तीन चेंडू आणि ९ विकेट राखून जिंकून दिले. धवनने १२ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद १५ धावा केल्या. विराट कोहलीने १४ चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद २२ धावा फटकावल्या.

तत्पूर्वी, ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव आणि मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराच्या (प्रत्येकी २ विकेट) अचूक आणि प्रभावी मा-यासमोर ऑस्ट्रेलियाला १८.४ षटकांत ८ बाद ११८ धावा करता आल्या. नियोजित कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या अनुपस्थिती पाहुणा संघ अधिक कमकुवत झाला होता. त्याचा प्रत्यय शनिवारीही आला. त्यांच्या केवळ तीन फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. त्यात सर्वाधिक योगदान फॉर्मात असलेला सलामीवीर आरोन फिंचचे राहिले. फिंचने एक बाजू टिकवून ठेवताना ३० चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांनी
निराशा केली.

हंगामी कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह (८) अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (१७), ट्रॅव्हिस हेड (९), मॉईझेस हेन्रिकेस (८), डॅनियल ष्टिद्धr(164)ास्तियन (९) आणि यष्टिरक्षक टिम पेन (१७) लवकर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला प्रत्येक षटकामागे जेमतेम सहा धावा जमवता आल्या. वॉर्नरने पहिल्याच षटकात मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दोन चौकार लगावले तरी पाचव्या चेंडूवर त्याच त्रिफळा उडाला. फिंचने मॅक्सवेलला हाताशी धरून दुस-या विकेटसाठी ४७ धावा जोडताना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लेगस्पिनर चहलने मॅक्सवेलला बाद करत जोडी फोडली.

कुलदीपने धोकादायक फिंचला आपल्या सापळय़ात अडकवले. फिंच परतला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या १० षटकांत ३ बाद ७६ धावा झाल्या होत्या. मात्र तो परतल्यानंतर पाहुण्या फलंदाजांमध्ये बाद होण्याची स्पर्धा लागली. कुलदीपसह बुमराने पाहुण्यांची मधली फळी मोडीत काढली. २७ धावांत पाच विकेट पडल्याने ऑस्ट्रेलियाचा धावांचा वेग मंदावला. १९व्या षटकात पाऊस आल्याने खेळ थांबवावा लागला. त्यावेळी पाहुण्यांनी ८ बाद ११८ धावा
केल्या होत्या.

[EPSB]

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला शनिवारपासून (७ ऑक्टोबर) झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (जेएससीए) आंतरराष्ट्रीय स्टेडियम सुरुवा

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version