Home विदेश कोरियाच्या अवकाशात अमेरिकेची शक्तिशाली विमानं

कोरियाच्या अवकाशात अमेरिकेची शक्तिशाली विमानं

0

कोरियन द्विपकल्पात तणाव वाढलेला असताना सोमवारी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्ध सराव केला. उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब पाठोपाठ क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाचे ढग जमा झाले आहेत.

सेऊल- कोरियन द्विपकल्पात तणाव वाढलेला असताना सोमवारी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्ध सराव केला. उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब पाठोपाठ क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाचे ढग जमा झाले आहेत. अमेरिकेची चार F – 35B फायटर जेट आणि दोन इ-1इ बॉम्बर विमाने सरावात सहभागी झाली होती.

मागच्याच आठवडय़ात उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेले सर्व निर्बंध धुडकावून लावत अमेरिकेला धमकी दिली. अमेरिकेला लवकरच सर्वात मोठी वेदना सहन करावी लागेल असा इशारा उत्तर कोरियाच्या राजदुताने दिला होता. उत्तर कोरियाने तीन सप्टेंबरला शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. त्यानंतर शुक्रवारी जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले. अमेरिकेने आपल्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमानाद्वारे उत्तर कोरियाला हवाई ताकद दाखवून दिली. उत्तर कोरियावर जरब बसवणे हा उड्डाणामागे हेतू आहे.

अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचे एकत्रित उड्डाण हा नियमित सरावाचा भाग होता. संयुक्त कारवाईची क्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या कवायती यापुढेही सुरू राहतील असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. दक्षिण कोरियाची चार फायटर जेट विमाने या सरावात सहभागी झाली होती. यापूर्वी ३१ ऑगस्टला अशा प्रकारचा युद्ध सराव करण्यात आला होता. उत्तर कोरियानवे बेजबाबदारपणे जी शस्त्रास्त्रांची स्पर्धा चालवली आहे ती तात्काळ बंद करावी अन्यथा उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा वारंवार अमेरिकेकडून इशारा देण्यात येत आहे. तरीही उत्तर कोरियाच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही.

[EPSB]

‘आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खाते’

‘आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खाते,’ असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शाकाहारीचे फायदे सांगितले आहेत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version