Home देश केंद्रीय कर्मचा-यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी!

केंद्रीय कर्मचा-यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी!

0

दिवाळी दीड महिन्यावर येऊन ठेपलेली असतानाच केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात १ टक्क्यांने वाढ झाली आहे.

नवी दिल्ली- दिवाळी दीड महिन्यावर येऊन ठेपलेली असतानाच केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात १ टक्क्यांने वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या ४९.२६ लाख कर्मचारी आणि ६१.१७ लाख निवृत्त कर्मचा-यांना याचा लाभ होणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ३,०६८.२६ कोटी रुपये सरकारी तिजोरीवर ताण पडणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचा-यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने सरकारी कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढवण्यास मंजुरी दिली आहे. एक टक्क्याने डीएमध्ये वाढ करण्यात आली असून १ जुलैपासून ही वाढ मिळणार आहे.

मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासोबत बीएसएनएलच्या मोबाईल टॉवर उद्योगाला वेगळे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीला तोटय़ातून बाहेर येण्यास मदत होणार आहे. डीएमध्ये १% वाढीचा निर्णय झाला असून ही वाढ १ जुलैपासून लागू केली गेली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरचा डीए ४ वरुन ५% झाला आहे. या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारचे ४९.२६ लाख कर्मचारी आणि ६१.१७ लाख पेन्शनर्सला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये डीए वाढीला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ३,०६८.२६ कोटी रुपये भार वाढणार आहे.

[EPSB]

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version