Home महामुंबई केईएमसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची गरज

केईएमसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची गरज

0

एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी झाली. यात जखमींवर उपचार करण्यासाठी परळ येथील केईएम रुग्णालयाची मोठीच मदत झाली होती.

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी झाली. यात जखमींवर उपचार करण्यासाठी परळ येथील केईएम रुग्णालयाची मोठीच मदत झाली होती. गोरगरिबांसाठी असलेल्या या रुग्णालयाला आर्थिक मदतीची गरज आहे. गेल्या चार दशकांत म्हणजे १९८३ च्या भिवंडी दंगलीपासून ते एल्फिन्स्टन दुर्घटनेपयर्ंत प्रत्येक वेळी केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले आपत्कालीन रुग्णसेवेचे नियोजन कोणालाही थक्क करणारे आहे.

अचूक व वेळेत केलेल्या उपचारांमुळे बॉम्बस्फोटापासून ते दंगलीपयर्ंत तसेच मोठय़ा अपघातांमधील शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अशा घटनांनंतर केईएममध्ये रुग्णांना भेट देण्यासाठी येणारे पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री व नेते हे डॉक्टरांचे तोंडभरून कौतुक करतात. मदतीची तोंडभरून आश्वासने देतात खरे, परंतु प्रत्यक्षात केईएमला कोणतीही आर्थिक मदत आजपयर्ंत दिली गेली नाही, हे कटू सत्य असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

२००६ सालच्या रेल्वे बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व मंत्र्यांनी केईएमला भेट देऊन तोंडभरून मदतीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा विचार करून तत्कालीन अधिष्ठात्री डॉ. नीलिमा क्षिरसागर यांनी केईएमला एम्सचा दर्जा देण्याविषयी पत्रही केंद्राला पाठवले. मात्र आजपयर्ंत हा दर्जाही मिळालेला नाही आणि केंद्र शासन व राज्य शासनाने केईएमला कोणतीही मदत दिली नाही. १९९२ची दंगल आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटच्या वेळी आपत्कालीन उपचार व्यवस्थापन केईएममध्ये विकसित करण्यात आले. दरवर्षी या आपत्कालीन व्यवस्थापनाची रंगीत तालीमही घेतली जाते.

[EPSB]

मराठी साहित्य संमेलन म्हणजेच चोरांची आळंदी आहे. साहित्य संमेलनाचा व्यवहार अत्यंत दृष्ट बुद्धीच्या पुरुषांनी नियंत्रित केला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version