Home महामुंबई बोरिवलीत रंगले कविसंमेलन

बोरिवलीत रंगले कविसंमेलन

0

ध्यास कवितेचा काव्यमंच आयोजित कविसंमेलन नुकतेच बोरीवली येथे झाले. कविसंमेलनाची संकल्पना बोली भाषा होती. महाराष्ट्रातील तसेच शेजारील राज्यांतून सुमारे ६० कवींनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. मालवणी, आगरी, वंजारी, अहिराणी अशा विविध बोलीभाषांतील कविता कविवृंदाने सादर केल्या.

मुंबई- ध्यास कवितेचा काव्यमंच आयोजित कविसंमेलन नुकतेच बोरीवली येथे झाले. कविसंमेलनाची संकल्पना बोली भाषा होती. महाराष्ट्रातील तसेच शेजारील राज्यांतून सुमारे ६० कवींनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. मालवणी, आगरी, वंजारी, अहिराणी अशा विविध बोलीभाषांतील कविता कविवृंदाने सादर केल्या.

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे आणि बोलीभाषा समिती प्रमुख डॉ. अनिल रत्नाकर हे बोलीभाषा काव्यकट्टय़ाचे प्रमुख पाहुणे होते. ख्यातनाम कवी रामनाथ म्हात्रे हे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले व खुसखुशीत आगरी कविता सादर केली.

सुरुवातीला कार्याध्यक्षा सौ. स्वाती शृंगारपुरे यांनी उपस्थित काव्यरसिकांचे स्वागत केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेचे सचिव राजेंद्र चौधरी यांनी खुमासदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. संस्थेचे अध्यक्ष कवी संदेश भोईर यांनी उपस्थितांचे आभार मानले व संस्थेच्या आगामी उपक्रमांविषयी माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी संतोष मोहिते, कवी श्रीकांत पवार व कवी नैनेश तांबे यांनी मोलाचे सहकार्य केले.

[EPSB]

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री टॉम अल्टर यांचे निधन

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते तथा लेखक टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version