Home महामुंबई नागुर्ले कातकरवाडीत रेशन कार्डाचे वाटप

नागुर्ले कातकरवाडीत रेशन कार्डाचे वाटप

0

कोकण विभाग आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हय़ातील आदिम जमात असलेल्या आदिवासी कातकरी समूहाचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

नेरळ- कोकण विभाग आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हय़ातील आदिम जमात असलेल्या आदिवासी कातकरी समूहाचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोकण विभागतालुक्यात शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून नागुर्ले कातकरीवाडीमध्ये सरकारी अधिकारी पोहोचले आणि त्या कातकरी समाजाच्या लोकांना शिधा वाटप पत्रिका देण्यात आली. त्यात १८ कुटुंबांना आता शासनाच्या अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार आहे.

कर्जत शहराजवळ नागूर्ले येथे दुर्गम भागात कातकरी वाडी असून ३० ते ३५ कुटुंबाची वस्ती असलेल्या या वाडीत अंगणवाडी नाही. जाण्यासाठी पक्का रस्ता नाही,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, या अडचणीसोबतच ब-याच कुटुंबांना रेशन कार्ड नव्हते. काही कुटुंबांचे रेशन कार्ड जीर्ण झाले होते, तर काही कुटुंबांचे रेशन कार्ड हरवले होते. या सा-या समस्यांचा पाढाच स्थानिक आदिवासी लोकांनी महसूल कर्मचारी आणि तहसीलदार यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी वाचला होता. जेवढय़ा लवकर आणि शक्य होईल तेवढय़ा समस्या सोडवण्याचा शब्द तहसीलदार कार्यालयाने दिले होते. रविवार असूनही निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार संजय भालेराव, पुरवठा आधिकारी म्हात्रे, तसेच आदिवासी लोकांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणा-या दिशा केंद्र सामाजिक संघटनेचे अशोक जंगले यांचे उपस्थितीत कुटुंबांना रेशन कार्डाचे वाटप केले.

[EPSB]

आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे,

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version