Home महामुंबई कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँकेची निर्मिती करणार

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँकेची निर्मिती करणार

0

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँक नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठय़ा शहरांकडे धाव घ्यावी लागते. रक्ताअभावी छोटी मोठी शस्त्रक्रिया सुद्धा होऊ शकत नाही.

कर्जत- कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँक नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठय़ा शहरांकडे धाव घ्यावी लागते. रक्ताअभावी छोटी मोठी शस्त्रक्रिया सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे लवकरच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँकेची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली. ते कर्जत उपजिल्हा रुग्णालय भेटीप्रसंगी बोलत होते.

ना. देशमुख यांनी दुपारी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आ. देवेंद्र साटम, ठाणे विभागाच्या उपसंचालिका रत्ना रावखंडे, जिल्हा शैल्यचिकित्सक अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे उपस्थित होते. यावेळी मंत्री महोदयांनी समस्या जाणून घेताना नागरिकांनी रुग्णालयात भेडसावणा-या अनेक समस्यांचा पाढाच वाचला.

तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा, अपुरा औषध पुरवठा, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी मशिनची असुविधा, शवगृहाची दुरवस्था, बंद अवस्थेतील उपकेंद्रे अशा एक अनेक समस्या मंत्रीमहोदयांसमोर भाजपचे किसान मोर्चाचे नेते सुनील गोगटे, तालुका अध्यक्ष दीपक बेहेरे, आरपीआयचे राहुल डाळिंबकर आदींनी मांडल्या. याप्रसंगी नगरसेविका बिनिता घुमरे, भाजप तालुका अध्यक्षा सुगंधा भोसले, उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, मनीषा अथनीकर आदी उपस्थित होते.

[EPSB]

भारनियमनामुळे नागरिकांचा संताप

सत्तारूढ झाल्याचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्याच्या तयारीत असतानाच वीज भारनियमनावरून भाजपला जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची पाळी आली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version