Home महामुंबई कर्जतमधील ग्रामपंचायतींसाठी २३५ अर्ज

कर्जतमधील ग्रामपंचायतींसाठी २३५ अर्ज

0

कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक १६ ऑक्टोबर रोजी होत आहेत. सात ग्रामपंचायतच्या ६७ जागांसाठी चौरंगी लढत होणार असून २३५ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

नेरळ- कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक १६ ऑक्टोबर रोजी होत आहेत. सात ग्रामपंचायतच्या ६७ जागांसाठी चौरंगी लढत होणार असून २३५ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी ७ जागांकरिता ३० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.

कर्जत तालुक्यातील उकरूळ, वेणगाव, वावलोळी, कळंब, दहिवली तर्फे वरेडी, कोंडीवडे, मांडवणे या सात ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून सरपंच पदासाठी आणि त्या ग्रामपंचायतीमधील ६७ सदस्यांसाठी १६ ऑक्टोबर रोजी होत आहे.तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी या ग्रामपंचायत निवडणुकासाठी आपली ताकद लावली आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष यांची आघाडी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, मनसे हे पक्ष ग्रामविकास आघाडी स्थापन करून जनतेचा कौल मागत आहेत. यावेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे मतदारांचा उत्साह हा नामांकन अर्ज दाखल करताना दिसून आला.

थेट सरपंच निवडतांना कोणत्याही राजकीय पक्षाचे आरक्षित चिन्ह निशाणी म्हणून ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मिळणार नसल्याने यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे मुक्त चिन्ह निशाणी म्हणून पीठासीन अधिकारी देणार आहेत,तरी देखील थेट सरपंच निवडीबद्दल कुतूहल सर्व राजकीय पक्षात निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अपेक्षेपेक्षा अधिक नामांकन अर्ज निर्धारित मुदतीमध्ये दाखल झाले आहेत. मात्र आज नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असली तरी खरे चित्र ५ सप्टेंबर रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याचे दिवशी स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागासप्रवर्ग साठी राखीव असून त्या जागेसाठी ४ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. तेथे ९ जागांसाठी तीन प्रभागात निवडणुका होणार असून त्यासाठी ३९ नामांकन अर्ज दाखल झाले आहे. मांडवणे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद हे सर्वसाधारण महिला राखीव असून तेथे त्या पदासाठी ४ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. तेथील ७ जागांसाठी तीन प्रभाग निवडणूक होणार असून ३० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.कळंब ग्रामपंचायत मध्ये १३ जागांसाठी ५ प्रभागात २८ उमेदवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले असून तेथील सरपंच पद हे सर्वसाधारण महिला राखीव असून त्या जागेसाठी केवळ २ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.

कोंदिवडे ग्रामपंचायत मध्ये तीन प्रभागात ९ जागांसाठी निवडणूक होणार असून तेथे ३३ तेथील सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव असून त्या पदासाठी ४ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. वेणगाव ग्रामपंचायत मध्ये ११ जागांसाठी चार प्रभागात निवडणूक होत असून त्या जागांसाठी ४४ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत,तर सरपंचपद हे सर्वसाधारण असल्याने त्यासाठी ६ अर्ज दाखल केले आहेत. वावळोली ग्रामपंचायतमध्ये ९ जागांसाठी तीन प्रभागात निवडणूक होणार असून त्या जागांसाठी २६ नामांकन अर्ज दाखल झाले असून तेथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असून त्यासाठी ५ नामांकन दाखल झाले आहेत.

[EPSB]

मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version