Home महामुंबई कल्याण रेल्वे यार्डाचा विकास आता लवकरच!

कल्याण रेल्वे यार्डाचा विकास आता लवकरच!

0

मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या रेल्वे मंत्रालयाने आता लोकलवरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण- मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या रेल्वे मंत्रालयाने आता लोकलवरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या आदेशानुसार रखडलेली विविध कामे मार्गी लावली जाणार आहेत. यात देशभरातील ४० रेल्वे यार्डांचा विकासही होणार आहे. यात मुंबई उपनगरातील आठ यार्डाचा समावेश आहे. त्यात कल्याणचाही समावेश असल्याने कर्जत आणि कसारा येथील रेल्वे प्रवासी वगार्ला मोठा दिलासा मिळणार आहे.

कल्याण रेल्वे स्थानकामध्ये सध्या एकूण सात प्लॅटफॉर्म आहेत. दर तीन मिनिटांना एक लोकल किंवा मेल गाडी येथे दाखल होते. दरमहा ५८ लाख प्रवासी येथून प्रवासी करू शकतात. यामुळे नेहमी वर्दळ असते. त्यात रेल्वे स्थानकामध्ये मेल/एक्सप्रेस किंवा लोकल शिरताना किंवा स्थानक सोडताना क्रॉसिंग असल्याने तीन ते पाच मिनिटे लोकल किंवा मेल गाडी सिग्नलजवळ पंचिंगसाठी थांबविली जात असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. यामुळे प्रवासी वगार्चा वेळ वाचविण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडेलिंग करण्याचा प्रस्ताव बनविला असून तोदेखील लवकरच मार्गी लागणार आहे.

कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रॅक, क्रॉसओव्हर्स आणि प्लॅटफॉर्मच्या पुनर्रचनेची योजना आखण्यात आली आहे. बाहेर गावाहून येणा-या अनेक गाड्या कल्याणमधून मुंबईतील सीएसटीएम स्थानक आणि कुर्ला रेल्वे स्थानकापयर्ंत चालविल्या जातात. त्यात बदल करत नव्याने धावणा?्या मेल गाड्या मुंबईत न आणता फक्त कल्याणपयर्ंत आणल्या जातील. मुंबई किंवा कुर्लापयर्ंत महत्त्वाच्या आणि निवडक गाड्याच आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

[EPSB]

स्मृती मंदिर परिसराची जागा संघाची नाही

नागपूरच्या रेशीम बाग परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्मृती मंदिर परिसर संघाचा नसल्याचा दावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने करण्यात आला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version