Home महामुंबई पालघर जिल्हा पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात

पालघर जिल्हा पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात

0

पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी या तालुक्यातील आदिवासी गांव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम राहिली आहे.

वाडा- पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी या तालुक्यातील आदिवासी गांव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम राहिली आहे. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात तालुकानिहाय वाडा-४१०, विक्रमगड-३०८, जव्हार-३४२, मोखाडा-२२९, डहाणू-६३९, पालघर-६१६, वसई-३८९ आशा एकुण ३१८१ इतक्या अंगणवाडय़ा आहेत. या अंगणवाडय़ांमध्ये जुलै २०१७ च्या अखेरीस ग्राम बाल विकास केंद्राच्या अहवालानुसार प्राप्त झालेल्या कुपोषित बालकांच्या यादीप्रमाणे तिव्र कुपोषित बालके (सॅम) तालुकानिहाय वाडा-१०१, विक्रमगड-१२८, जव्हार-१४१, मोखाडा-४१, तलासरी-१८, डहाणू-१५६, पालघर-३८, वसई-३२ याप्रमाणे जिल्ह्यभरात एकुण ६५५ तिव्र कुपोषित बालके आहेत.

मध्यम (म्याम) या कुपोषित बालकांच्या श्रेणी मध्ये वाडा-५२५, विक्रमगड-७३८, जव्हार-८४७, मोखाडा- २६४, तलासरी-३२८, डहाणू-३८४, पालघर-३८१, वसई-१५४ याप्रमाणे जिल्ह्यभरात एकुण ३६२१ मध्यम कुपोषित बालके आहेत. तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची पालघर जिल्ह्यातील एकूण आकडेवारी बघता ४२७६ एवढी आहे. त्याच प्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये २६०३ एवढी कुपोषित बालके असून यातील ५११ बालके आजही तीव्र कुपोषित म्हणजे स्याम श्रेणीत आहेत. तर २०१२ बालके मध्यम कुपोषित म्हणजेच म्याम श्रेणीत आहेत.विशेष म्हणजे जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील बालकांचा कुपोषित, भुकबळी आदी विविध कारणांमुळे झालेल्या बालमृत्यूचे प्रमाण देखील अधिक असून एप्रिल २०१७ ते आगष्ट २०१७ अखेर पयर्ंत डहाणू तालुक्यात ५४, जव्हार ४४, विक्रमगड १९, मोखाडा ११, पालघर ३२, तलासरी १६, वाडा १३, वसई १५ याप्रमाणे जिल्ह्यभरात एकुण २०४ कुपोषित बालके भुकबळी, विविध प्रकारच्या आजाराने दगावली आहेत.

११ सप्टेंबर २०१७ पासून अंगणवाडी सेविका मानधन वाढीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत, या दरम्यान अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या सकस आहार बंद असल्याने तसेच शासनाच्या तोकड्या सकस आहार देण्याच्या कार्यकाळात पालघर जिल्ह्यात ११ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत ० ते १ वयोगटातील १० कुपोषितांचा तर १ ते ६ या वयोगटातील ५ कुपोषित बालकांचा मृत्यू म्हणजे १५ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे जिल्हा भरातील आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी राबविण्यात येणा-या योजना अथवा यंत्रणा किती सक्षम आहेत हे यावरून स्पष्ट होते. पालघर जिल्हय़ात जास्त कुपोषित बालके आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनेची गरज आहे.

[EPSB]

ठाणे स्टेशनपासून ३०० मीटरवर वाहनबंदी!

विमानतळावर विमानापर्यंत पोहचण्यासाठी ट्रायव्हलेटर्स किंवा एअरसाइड ट्रान्सफर बसचा उपयोग केला जातो.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version