Home महाराष्ट्र जानकी पाडा येथे कच-याचे साम्राज्य

जानकी पाडा येथे कच-याचे साम्राज्य

0

वालीव गोखीवरे जानकी पाडय़ात कच-याचे साम्राज्य पसरले असल्याने स्वच्छता अभियानाला हरताळ फासण्यात आल्याचे समोर आले आहे.

नालासोपारा- वालीव गोखीवरे जानकी पाडय़ात कच-याचे साम्राज्य पसरले असल्याने स्वच्छता अभियानाला हरताळ फासण्यात आल्याचे समोर आले आहे. वालीव येथील जानकीपाडा येथे कच-याचे ढीग पडले असून स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी पालिकेने कचरा कुंडय़ा ठेवल्या नसल्याने येथील परिसरातील रहिवाशांनी सगळीकडे अस्ताव्यस्त कचरा फेकला आहे. या ठिकाणी शाळेतील मुलांना, शिक्षकांना, नागरिकांना या कच-यातून नाकाला रुमाल धरून कच-यातून चालावे लागत आहे.

शिवाय या ठिकाणी गायी आहेत त्या कच-यातील खाद्य शोधत असताना कच-यातील प्लास्टिक त्यांच्या पोटात जात आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कच-यावर ज्या माश्या बसतात त्याच पुन्हा जेवणावर बसतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २ ऑक्टोबरला शहरात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविली जात होती. ज्या ठिकाणी रोज साफसफाई कामगार करतात त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम करत असताना दिसत होते. जर गावागावात जाऊन स्वच्छता केली तरच हा स्वच्छ भारत अभियान सफल होईल. प्रत्येक नागरिकाने स्वत:शी ठरवले पाहिजे की आपण आपले जसे घर स्वच्छ ठेवतो.

घरातील कचरा नेहमी साफ करतो तसेच आपण कचरा रस्त्यावर न फेकता तो कचरा कुंडीत टाकावा. लहान मुलांना शाळेत शिकवलं जातं. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. पण जी लहान मुले शिकतात त्याचं अनुकरण करताना दिसतात. मात्र, आजकाल मोठी माणसेच कचरा करताना दिसतात. आता लहान मुलांचे पाहून मोठय़ांनी हे शिकलं पाहिजे की, कचरा रस्त्यावर न फेकता तो कचरा कुंडीतच टाकावा. पालिकेने शहरात सगळीकडे कचरा कुंडय़ा ठेवल्या. पण गावागावात, पाडय़ापाडय़ात जर कचरा कुंडय़ा ठेवल्या तरच सर्वजण कचरा कुंडीत टाकतील.

[EPSB]

विमानतळावर विमानापर्यंत पोहचण्यासाठी ट्रायव्हलेटर्स किंवा एअरसाइड ट्रान्सफर बसचा उपयोग केला जातो.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version