Home महाराष्ट्र इसिसशी संबंधित शिक्षकास एटीएसने हिंगोलीतून ताब्यात घेतले

इसिसशी संबंधित शिक्षकास एटीएसने हिंगोलीतून ताब्यात घेतले

0

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने सोमवारी हिंगोलीतून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

संग्रहित छायाचित्र

हिंगोली- इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने सोमवारी हिंगोलीतून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. रईसुद्दीन सिद्दिकी असे याचे नाव असून तो हिंगोलीतील एका उर्दू शाळेमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हिंगोलीतही इसिसचे परभणी कनेक्शन असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे.

सिद्दिकी हा मूळ परभणीचा रहिवासी आहे. तो २००३ पासून हिंगोली जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पूर्वी तो औंढा येथे होता. मागील तीन वर्षापासून हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेवर कार्यरत होता. येथील आजम कॉलनीत तो भाडय़ाच्या खोलीत राहात होता. मात्र त्याचे परभणीला जाणे-येणे होते. तो इतरांना प्रशिक्षित करीत असल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र एटीएसने रविवारी शेख इकबाल शेख कबीर अहमद याला परभणी शहरातील मदिनानगर भागातून ताब्यात घेतले होते. यापूर्वी एटीएसने परभणीतील नासेरबीन चाऊस व शाहीद खान या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने शेख इकबाल शेख कबीर अहमद आणि रईसुद्दीन सिद्दिकी यांना ताब्यात घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version