Home ताज्या घडामोडी साता-यात डी.जे. वाजलाच नाही, खा. उदयनराजे मिरवणूकीतून गायब

साता-यात डी.जे. वाजलाच नाही, खा. उदयनराजे मिरवणूकीतून गायब

0

प्रहार वेब टीम

सातारा : सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या साता-यात गणेश विसर्जन मिरवणूकीत डी.जे. वाजलाच नाही. खासदार उदयनराजे मिरवणूकीत कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे उदयनराजे समर्थकांचा चांगलाच हिरमोड झाला. तर डी. जे. मुक्त मिरवणूकीस सहकार्य केल्याबद्दल पोलिसांनी सातारकरांना धन्यवाद दिले.

जब तक रहेंगा गणपती, तब तक रहेंगा डी. जे., अशी डायलॉगबाजी करणारे खा. उदयनराजे भोसले व डी.जे. मुक्त मिरवणूक करण्यासाठी कंबर कसलेले पोलिस प्रशासन यामुळे साता-याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

साता-यात नेहमीच राजघराण्यातील संघर्ष, अवैध धंदे व टपोरीगिरी याचीच चर्चा होत असते. राजघराणे विरुध्द प्रशासन असेही चित्र अनेक वेळा दिसते. त्याचेच सावट यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणूकीवर होते.

यंदा प्रथमच सातारा पोलिसांनी डी. जे. विरोधात जनजागृती फेरी काढली. याला विद्यार्थ्यांसह सातारच्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य वाढले होते.

खा. उदयनराजेंनी डायलॉगबाजी करत गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी जिल्हा प्रशासन व पोलीस दलाला आव्हान दिले होते. तर सातारा पोलीस डी. जे. विरोधात ठाम उभे होते. कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व वरिष्ठ अधिकारी यांनी साता-यात समाजकंटकांवर विशेष नजर ठेवली होती. त्यामुळे ख-या अर्थाने श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक डी. जे. मुक्त झाली.

दरम्यान, खा. उदयनराजेंनी सातारच्या डी.जे. प्रेमी समर्थकांकडे पाठ फिरवल्याने त्यांचे चुलत भाऊ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्त्यातच ‘मला आमदार झाल्यासारखे वाटतेय’ या गाण्यावर ठेका धरला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version