Home टॉप स्टोरी ‘नमाज बरोबर तर पोलीस स्थानकात जन्माष्टमी का नाही’

‘नमाज बरोबर तर पोलीस स्थानकात जन्माष्टमी का नाही’

0

ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढणे बरोबर असेल तर पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

लखनऊ- ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढणे बरोबर असेल तर पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. सायंटिंफिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लखनऊ जनसंचार आणि पत्रकारिता संस्था तसेच प्रेरणा जनसंचार व शोध संस्थाच्या अंतर्गत केशव संवाद पत्रिकाचा विशेषांक ‘अंत्योदय की ओर’चे प्रकाशन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

सर्व जाती धर्माच्या लोकांना सण-उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य आहे. ख्रिस्मस साजरा करा किंवा नमाज पढा, काहीही करा, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून करा, असे योगी यावेळी म्हणाले. उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर अवैध कत्तलखान्यावर बंदी घालण्यात आली. आपल्या भाषणात आदित्यनाथांनी कावड यात्रेचाही संदर्भ दिला.

कांवडियांच्या यात्रेवर डान्स करण्यावर, गाणे आणि डीजे वाजवण्यावर बंदी कशी काय लागू शकते?, असा सवाल स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला. जर अशा प्रकारे आपल्याला बंदीची अंमलबजावणी करता येत नसेल तर, यात्रा नेहमीसारखी चालू राहिल, असे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version