Home टॉप स्टोरी अखेर हनीप्रीत पोलिसांना सापडली

अखेर हनीप्रीत पोलिसांना सापडली

0

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर फरार झालेली त्याची दत्तक मुलगी हनीप्रीतला अखेर अटक करण्यात आली आहे.

चंदीगड- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर फरार झालेली त्याची दत्तक मुलगी हनीप्रीतला अखेर अटक करण्यात आली आहे. हरियाणातील पंचकुला पोलिसांनी जीरकपूरजवळ हनीप्रीतला अटक केली.

दुपारी तीनच्या सुमारात जीकरपूरजवळील पटियाला रोडवर हनीप्रीतसोबत तिच्या एका सहकारी महिलेला अटक करण्यात आली आहे. हनीप्रीतला उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर करणार आहोत, असे पंचकुलाच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले.

हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. पंचकुलामध्ये हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली हनीप्रीतविरोधात सेक्टर-५ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साध्वींवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राम रहीमला पोलिस कोठडीतून पळवण्याचा कट रचल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे.

पोलिसांच्या मते, २५ ऑगस्टला राम रहीम जेव्हा जेलमध्ये गेला तेव्हा हनीप्रीतने काही गुंडांच्या मदतीने हिंसाचार घडवून आणला. ज्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले. तसेच या हिंसाचाराचा फायदा घेऊन राम रहीमला पळवून नेण्याचा कटही तिने रचला होता. असा पोलिसांचा दावा आहे.

साध्वींवरील बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली. राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला. वडिलांबरोबर आपल नाते पवित्र असल्याचे हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितले. मी माझी मानसिक स्थिती सांगू शकत नाही. मला देशद्रोही म्हटले गेले हे साफ चुकीचे आहे. वडील तुरूंगात गेल्यावर मला माझ्या जवळ असलेल्या व्यक्तींनी जो सल्ला दिला मी त्याप्रमाणेच वागली, मला काही समजत नव्हते. मुलाखती दरम्यान रडता-रडता हनीप्रीत म्हणाली, तुम्ही माझी मानसिक स्थिती समजून घ्या, मी डिप्रेशनमध्ये गेली होती. इतके दिवस गायब असण्याच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, मला काही समजत नव्हते. मी हरियाणातून कशीतरी दिल्लीला गेले.

दरम्यान, हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ता याने मात्र हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता.

[EPSB]

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version