Home महामुंबई मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक विस्कळीत

0

पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळ स्लीपर बदलण्याचे काम सुरू असल्यामुळे मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक शनिवारी सकाळी ठप्प होती.

पालघर- पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळ स्लीपर बदलण्याचे काम सुरू असल्यामुळे मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक शनिवारी सकाळी ठप्प होती. दीड ते दोन तास एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सफाळे- वैतरणा दरम्यान रेल्वे ट्रॅकचे खराब स्लीपर बदलण्याचे काम शुक्रवारी रात्री सुरू करण्यात आले होते. पहाटे ३ ते सकाळी ७ वाजेपर्यंत या मार्गावरची सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र हे काम वेळीच पूर्ण न झाल्याने मुंबईहून गुजरातला जाणारी आणि गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

बोरिवलीवरून पहाटे ६.२५ ला बोरिवलीहून गुजरातला जाणारी एक्सप्रेस तीन तास उशिराने म्हणजे पावणे नऊ वाजता सुटली. इंटरसिटी एक्सप्रेसही तीन तास खोळंबून होती. विरार ते सफाळे दरम्यानही रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. तर डहाणूकडे जाणा-या लोकलही रद्द करण्यात आल्या.

तब्बल दिड ते दोन तासानंतर वाहतूक सुरू झाली. मात्र लांबचा प्रवास करणारे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले तर रेल्वेस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. शिवाय रेल्वेकडून कोणतीही उदघोषणा होत नसल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version