Home देश फरार हनीप्रीत अखेरीस आली समोर; म्हणाली माझे आणि राम रहीमचे नाते पवित्र

फरार हनीप्रीत अखेरीस आली समोर; म्हणाली माझे आणि राम रहीमचे नाते पवित्र

0

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत दीर्घ काळानंतर समोर आली आहे.

नवी दिल्ली- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत दीर्घ काळानंतर समोर आली आहे. हनीप्रीतने एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतील मी आणि राम रहीम पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा हनीप्रीतने केला आहे. माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये पवित्र नातं असल्याचे हनीप्रीतने या मुलाखतीत म्हटले आहे.

इतके दिवस गायब असण्याच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, मला काही समजत नव्हते. मी हरियाणातून कशीतरी दिल्लीला गेले. आता हरियाणा-पंजाब कोर्टात जाणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पणाच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, यासाठी ती कायदेशीर सल्ला घेणार आहे. ‘सिरसामध्ये जे काही घडलं त्यामुळे मी खूप घाबरले होते. माझी तेव्हाची मानसिक अवस्था आता सांगता येणार नाही. मला कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया माहिती नव्हती. मी माझ्या वडिलांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये कशी गेली? असा सवाल मला लोक विचारतात, पण ही गोष्ट कोर्टाच्या परवानगी झाली, असं हनीप्रीतने या मुलाखतीत म्हटले आहे.

सिरसामध्ये दंगल भडकविण्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पण या मुलाखतीत हनीप्रीतने तिच्यावरचा आरोप फेटाळून लावला. दगड भडकताना मी दिसते आहे, असा एखादा व्हीडिओ मला दाखवा, असे तिने म्हटले. काही लोकांना मुद्दामून दंगल भडकविण्यासाठी पाठविण्यात आलं होतं, असा खुलासा तिने केला. या मुलाखतीत हनीप्रीतला डे-यामध्ये असलेल्या रहस्यांबद्दल विचारण्यात आलं. जी लोक डे-यात मानवी सांगाडे असल्याचा दावा करतात त्यांना एक तरी सांगाडा तेथे सापडला का? असा सवाल तिने विचारला आहे. ज्या दोन मुलींनी राम रहीमवर आरोप लावले, त्या मुली समोर कधी समोर आल्या का? राम रहीमला फक्त चिठ्ठय़ांच्या आधारावर दोषी ठरविण्यात आलं, असे म्हणत राम रहीम निर्दोष असल्याचा दावा हनीप्रीतने केला आहे.

[EPSB]

कोकण रेल्वेमार्गावर दिवाळीसाठी विशेष फे-या

दिवाळी सणासाठी कोकण रेल्वेमार्गावर १३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान सहा विशेष गाड्या धावणार आहेत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version