Home महाराष्ट्र गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे

गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे

0

गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांनी केले आहे.

वडखळ- गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांनी केले आहे. समाजामध्ये कायदा, सुव्यवस्था आणि शांतता कायम राखण्याच्या दृष्टीने पोलिसांप्रमाणेच दक्ष नागरिक हादेखील एक महत्त्वाचा घटक समजला जातो. परिणामी दक्ष नागरिकांच्या सहकार्यातून गुन्हेगारी नष्ट करणे शक्य होईल. आपल्या परिसरात एखादी अनोळखी संशयास्पद व्यक्ती अथवा बेवारस संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनीही संबंधित संशयास्पद व्यक्तीची चौकशी करावी व तत्काळ पोलिसांना खबर द्यावी जेणेकरून पोलीस योग्य वेळी घटनास्थळी जाऊन पुढील दुर्घटना रोखू शकतील.

गाडीमध्ये प्रवास करताना अनोळखी इसमांकडून प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकार घडत असतात. परिणामी अशा प्रकारांची पुनरावृती होऊ नये यासाठी प्रवाशांनीही गाडीमध्ये प्रवास करताना अनोळखी सहप्रवाशांपासून सावध रहावे व सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी देऊ केलेले कोणतेही खाद्यपदार्थ स्वीकारू नये. नागोठणे परिसरात अरूंद रस्ते असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्न वारंवार निर्माण होत असतो. परिणामी बाजारेठेतील दुकानदार व व्यापारी वर्गाने तसेच वाहनचालकांनी देखील याबाबत विशेष दक्षता घेऊन या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकांनी देखील वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

अनेक ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याच्या घटना व गाडीमध्ये प्रवास करताना दागिने व मौल्यवान वस्तू चोरी होण्याच्या घटना घडत असल्याने अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी व विशेष करून महिलांनी दक्ष रहावे असेही आवाहन नागोठणे पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांनी या परिसरात कायदा-सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने विशेष दक्षता घेतलेली असून परिसरात कोणतेही गैरप्रकार अथवा अवैध धंद्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी. के. पालवणकर, उपनिरीक्षक मनोज मोरे, राजेंद्र घाडगे तसेच सर्व पोलिस कर्मचारी जागोजागी साध्या वेशात टेहळणी करीत असतात. नागोठणे पोलिसांच्या या दक्ष कार्यपद्धतीचे जनतेकडून कौतुक केले जात आहे.

[EPSB]

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version