Home विदेश जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन’

जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन’

0

जीएसटी, नोटाबंदी, महगाई आदी मुद्यांमुळे एकीकडे देशभरात मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. पण दुसरीकडे जागतिक बँकेच्या दाव्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे.

वॉशिंग्टन- जीएसटी, नोटाबंदी, महगाई आदी मुद्यांमुळे एकीकडे देशभरात मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. पण दुसरीकडे जागतिक बँकेच्या दाव्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात अच्छे दिन येतील, असा दावा जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी केला आहे. किम म्हणाले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चा भारतीय अर्थव्यवस्थेवर लवकरच सकारात्मक बदल दिसून येईल. जीएसटीसाठी प्राथमिक तयारींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर पहिल्या तिमाहित घसरला. पण आगामी काळात जीएसटीचा सकारात्मक बदल दिसून येईल.

किम पुढे म्हणाले की, सध्याची घसरण ही तात्पुरती असून, येत्या काही महिन्यात चांगले बदल दिसतील, आणि भारताच्या जीडीपीमध्येही मोठी वाढ झाल्याचे पाहायाला मिळेल. पंतप्रधान मोदी औद्योगिक क्षेत्रात सुधारणा आणण्यासाठी वास्तवदर्शी काम करत असल्याने, त्यांच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम नक्कीच दिसतील.
दरम्यान, किम यांनी पंतप्रधानांचे कौतुक केलं. पंतप्रधान मोदी सुधारणांसाठी प्रतिबद्ध आहेत. ते भारताची अवस्था सुधारण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. सध्या भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. आणि इतर देशांप्रमाणेच त्यामध्ये सुधारणांची शक्यताही सर्वाधिक आहे.

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर पहिल्या तिमहित भारताच्या आर्थिक विकासात घसरण पाहायला मिळाली. एप्रिल ते जून या तिमाहित भारताचा जीडीपी ५.७ टक्के होता. तर जानेवारी ते मार्चदरम्यान हा दर ६.१ टक्के होता. यामुळे विरोधी पक्षांसह अनेक अर्थतज्ज्ञांनीही जीडीपी घसरण्यासाठी नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

[EPSB]

सध्या परतीचा पाऊस गुजरातमध्ये रेंगाळला आहे. त्यामुळे शुक्रवारी व शनिवारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेला पाऊस परतीचा वाटत असला तरी राज्यातून पाऊस माघारी जायला अद्याप अवधी आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version