Home महामुंबई आर्डे गोरक्षनाथ मठामध्ये भागवत सप्ताह

आर्डे गोरक्षनाथ मठामध्ये भागवत सप्ताह

0

कर्जत तालुक्यातील आर्डे गावात नाथसंप्रदायाचे गोरक्षनाथ मठ असून तेथे सालाबादप्रमाणे भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते.

नेरळ- कर्जत तालुक्यातील आर्डे गावात नाथसंप्रदायाचे गोरक्षनाथ मठ असून तेथे सालाबादप्रमाणे भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. ३१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या भागवत सप्ताहाचा ६ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आले. सतत सात दिवस भागवत ग्रंथाचे पारायण ऐकण्यासाठी मठामध्ये शेकडो नाथभक्त साधक दररोज येत होते. सतनाम ब्रम्हापंथीय नाथसंप्रदाय गोरखनाथ मठाचे मठाधिपती सद्गुरू जाणकीदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  त्यांचे शिष्य अक्षयनाथ महाराज, रामनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते.

३१ ऑगस्ट रोजी पहाटे भागवत ग्रंथ पारायण सुरू झाले. सकाळी सहापासून सायंकाळी सात वाजेपर्यन्त हे पारायण सात दिवस चालले. त्यावेळी सात दिवस हे पारायण ऐकण्याची श्रीकृष्णाची म्हणून ऐकण्याची जबाबदारी उद्धव म्हणून चिंचवली येथील साधक रामदास कृष्णा भगत यांनी पार पाडली. भागवत ग्रंथाचे पारायण वाचन साधक गुरुनाथ शेळके, विठ्ठल बदे, शांताराम धुळे, पांडुरंग म्हसे, यांनी केले. त्या दिवसभराच्या कालखंडात प्रवचन देखील सादर झाले.

[EPSB]

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीमुळे नाराज असणा-यांची संख्या भारतीय जनता पक्षात सातत्याने वाढत चालली असून पक्षाचे आमदार आशीष देशमुख यांचे वक्तव्य हा त्याचाच परिपाक असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version