Home महामुंबई ‘व्यक्ती मारून विचार मरत नाहीत..’

‘व्यक्ती मारून विचार मरत नाहीत..’

0

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी ह्या विचारवंतांची हत्या ज्या प्रकारे झाली तशाच प्रकारे ही हत्या झाली आहे.

कल्याण- दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी ह्या विचारवंतांची हत्या ज्या प्रकारे झाली तशाच प्रकारे ही हत्या झाली आहे. त्यांची हत्या करून विचार मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र व्यक्ती मारून विचार मरत नाहीत, हे हत्या करणा-याला कळले पाहिजे. यानंतर हजारो गौरी जन्माला येतील. असे विचार एका तरुणीने गौरी यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केले आहे. ज्येष्ठ कन्नड पत्रकार, संपादक गौरी लंकेश यांची मंगळवारी रात्री बंगळूर येथील राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

ह्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ कल्याणमध्ये कल्याण विकासिनी, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती, इतर मागासवर्गीयांची संघटना, शिल्ड संस्था आदी विविध संस्थेच्या वतीने धिक्कार आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती उदय रसाळ यांनी दिली. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा वसई-विरार महानगर पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षकांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले.

[EPSB]

धावत्या लोकलमधून तरुणीला खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना विरार रेल्वे स्थानकावर घडली.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version