Home महामुंबई हायकोर्टाने अल्पवयीन पीडितेला गर्भपाताची परवानगी नाकारली

हायकोर्टाने अल्पवयीन पीडितेला गर्भपाताची परवानगी नाकारली

0

ठाण्यातील एक अल्पवयीन मुलगी बलात्कारामुळे गर्भवती राहिल्याने आणि तिच्या प्रकृतीच्या दृष्टीने हे धोकादायक असल्याने तिच्या वडिलांनी गर्भपाताची परवानगी मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई- ठाण्यातील एक अल्पवयीन मुलगी बलात्कारामुळे गर्भवती राहिल्याने आणि तिच्या प्रकृतीच्या दृष्टीने हे धोकादायक असल्याने तिच्या वडिलांनी गर्भपाताची परवानगी मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन केईएम रुग्णालयाला मेडिकल बोर्डाची स्थापना करून मुलीची तातडीने वैद्यकीय तपासणी करून अहवाल देण्यास सांगितले. मात्र अपत्यात कोणताही दोष आढळला नाही त्यामुळे हायकोर्टाने अशी परवानगी नाकारली आहे.

ठाण्यात पानबिडी व दूधविक्रेत्याच्या या १६ वर्षीय मुलीला आरोपी श्यामलाल याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला, असा आरोप आहे. कापूरबावडी पोलिसांनी श्यामलालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मुलीला मासिक पाळी येणे बंद झाल्यानंतर तिच्या पालकांनी चौकशी केली असता तिने घडलेली हकिकत सांगितली. त्यानंतर पालकांनी तिला मुंबईतील सायन रुग्णालयात डॉक्टरांना दाखवल्यानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.

मुलगी सध्या अ‍ॅनेमियाने आजारी असून तिची प्रकृती ठीक नाही. सध्या ती २६ आठवडय़ांची गर्भवती असून बाळाची आई होण्यासाठी ती सक्षम नाही. त्यामुळे गर्भपाताची परवानगी द्यावी, अशा विनंतीची याचिका मुलीच्या वडिलांनी केली आहे. त्यामुळे न्या. रणजित मोरे व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन केईएमच्या मेडिकल बोर्डाकडून अहवाल मागवला आहे. त्यानुसार, अहवाल सादर झाल्यानंतर न्यायालयाने गर्भपात करण्याची परवानगी नाकारली आहे.

[EPSB]

गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळील पार्ले येथे ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. भरधाव असणा-या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version