Home महाराष्ट्र पुण्यातील कचराकोंडी कायम, नेते परदेश वारीवर

पुण्यातील कचराकोंडी कायम, नेते परदेश वारीवर

0
संग्रहित छायाचित्र

पुण्यातील फुरसुंगीमध्ये १७ दिवस उलटले तरी जागोजागी कच-याचा ढीग साचून आहे यावर कोणताही तोडगा न काढता पुण्याचे नेते परदेशवारीवर गेले आहेत. 

पुणे- पुण्यातील फुरसुंगीमध्ये १७ दिवस उलटले तरी जागोजागी कच-याचा ढीग साचून आहे. त्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. असे असतांना कच-याचा प्रश्न वा-यावर सोडून पुण्याचे नेते परदेश वारीवर गेले आहेत.

फुरसुंगीमध्ये कचरा टाकण्यास गावक-यांनी तीव्र विरोध केला आहे. कच-याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. मात्र, कच-याच्या प्रश्नावर प्रशासनाने अद्यापही कोणतेही पाऊल उचलेले नाही.

या साठलेल्या कच-यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी ऑस्ट्रेलिया आणि मॅक्सिकोच्या दौ-यावर गेले आहेत.

दरम्यान, महापौर मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणासाठी आयोजित परिषदेसाठी आजपासून आठ दिवस मॅक्सिकोला जाणार आहेत. तर पालकमंत्री गिरीष बापट हे २ मे ते ११ मेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर असणार आहेत. त्यामुळे कच-याचा प्रश्न आता कसा सुटणार याकडे पुणेकरांचे डोळे लागून राहिले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version