Home ताज्या घडामोडी फ्रेंडशिप डे स्पेशल- मैत्रीचा धागा अढळ राहू दे!

फ्रेंडशिप डे स्पेशल- मैत्रीचा धागा अढळ राहू दे!

0

मैत्रीला वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. पण, मैत्री कुणाशी करावी याचे भानही असायला हवे. एखाद्या व्यक्तीवर आपण मित्रत्वाच्या भावनेतून मैत्री करतो. पण, समोरच्या व्यक्तीने जर त्याचा गैरफायदा घेतल्याच्याही काही घटना घडल्या आहेत. आज ५ ऑगस्ट जागतिक फ्रेंडशिप डे निमित्त विशेष लेख…

मैत्री म्हणजे काय?

कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी, प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी मैत्री म्हणजे, जीवनातील एक अतूट नातं वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी..

मैत्रीला वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. पण, मैत्री कुणाशी करावी याचे भानही असायला हवे. एखाद्या व्यक्तीवर आपण मित्रत्वाच्या भावनेतून मैत्री करतो. पण, समोरच्या व्यक्तीने जर त्याचा गैरफायदा घेतल्याच्याही काही घटना घडल्या आहेत. मैत्री आहे म्हणून आपण एखादी गोष्ट आपण त्याच्यासमोर प्रगट करतो. पण, तो त्याचा कसा गैरफायदा घेऊ शकतो हेही काही उदाहरणांवरून अनुभवास येते. म्हणून मैत्रीचा धागा पकडताना तोही विचारपूर्वक पकडावा, यात दुमत नक्कीच नाही. तसेच मैत्रीचा काहीजण वेगळय़ा पद्धतीने विचार करतात. काहींची निखळ आणि निरलस मैत्री अशी असते. पण, त्या मैत्रीतही संशय घेणारे मित्र आज जग अनुभवत आहे. त्यामुळे कुणावर विश्वास ठेवायचा या निष्कर्षाप्रत आपण असतो. काही जणांना मैत्री तोडायचीच झाल्यास आणि मैत्री तुटण्यासाठी दुस-याच्या मनात कसे विष पेरण्यात ते वाकबगार असतात, हेही आता दिसून येऊ लागले आहे.

मैत्री आंधळी असते म्हटले जाते. काहींची मैत्री त्याच्या श्रीमंतीत असते. काहींची त्याच्या ताकदीत, काहींची मैत्री त्याच्या दिसणेपणात. काहींची मैत्री त्याच्या पीळदार शरीरयष्टीत, काहींची श्रीमंती त्याच्या स्वभावात. पण, मैत्री करून आपण काय साधले, तर काहीच नाही असे म्हणत. मैत्री ही वरील कोणत्याच गोष्टीत नसावी, ती ज्याच्या त्याच्या भावनांवर विश्वास ठेवणारी असावी. यातच खरं सुख असते. मुला – मुलींची मैत्री एकमेकांच्या बोलण्यात, त्याच्या स्वभावात होते. पण, जेव्हा मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रूपांतर त्यांच्या एकमेकांच्या सहजीवनात झालं की, मग एकमेकांचे रंग एकमेकांच्या डोक्यात चमकू लागतात. अरे! ही व्यक्ती अशी आहे? मी ओळखायला मात्र, विसरले / विसरलो. मला एवढे माहीत असते तर.. माझी फसवणूक झाली. बाहेरून गोरा आणि आतून मात्र काळा. तसेच रंगाप्रमाणेही त्याचे रंग काळे आहेत. पण, वेळ निघून गेलेली असते. एखाद्याचे छद्मी हास्यही समोरच्याला खूप काही तरी सांगून जाते.

मैत्री हे नातं असं आहे की, ते कायमच जपायचं असतं. सख्खे मित्र हे पक्के वैरी जरी झाले, तर त्यांनी आपापली गुपितं उघड करायची नसतात. त्यामुळे एखादी महत्त्वाची गोष्ट म्हणूनच आपण मित्राशी शेअर करतो. पण, मित्राशी काही कारणांवरून वैर निर्माण झाले, तर त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. एखाद्यावर विश्वास म्हणून आपण काही मते व्यक्त करतो. पण, त्याचा त्रास त्याला होईल असे कृत्य टाळणे गरजेचे आहे.

आजही ते कधी कधी एकमेकांशी बोलतात

कधी मेसेसमधून तर कधी इ-मेलमधून..
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात
असतात..
एकमेकांची खबर ठेवणे
आजही त्यांनी सोडलेली नाही,
समोरच्याला इग्नोर करणं
आजही त्यांना जमलेलं नाही.
जरा काही खट्टा झाला की, एकमेकांची
काळजी करत बसतात.. कारण, आजही ते
कधी कधी एकमेकांशी बोलतात,
पण आता पूर्वीसारखं ऊठसूट ते
एकमेकांना फोन करत नाहीत,
जर फोन केलाच कोणी तर काय बोलायचे हे
दोघांनाही सुचत नाही..
मग फोनवर उगाचच ते शब्दांशी खेळत
बसतात.. जेव्हा आज ते
कधी कधी एकमेकांशी बोलतात
त्या दोघांना वेगळं होऊन बरेच महिने
झालेत.. आता ते फक्त चांगले मित्र
म्हणून राहिलेत..
तरीही कधी कधी जुन्या आठवणी मनामध्ये
हळूच डोकावतात.. जेव्हा आज ते
कधी कधी एकमेकांशी बोलतात,
ती टेन्शनमध्ये
असली की, (तिचा पहिला फोन त्यालाच
असतो..)
तोही सगळी कामे बाजूला सारून
तिच्यासाठी हाजीर राहतो.
कारण, त्याला माहीत असतं.
फार काही झाल्याशिवाय तिचा आवाज
कातर नसतो..
त्याच्याइतकं जवळचं असूनही
कोणीच नसतं..
मग जोडीदाराच्या नकळत ते
एकमेकांना भेटतात.. कारण, आजही ते
कधी कधी एकमेकांशी बोलतात
त्याच्यासाठी कधीकधी ती ही कासावीस
होते..
विसर विसर म्हणता म्हणता, त्याचीच
होऊन राहते..
पण, तिच्या भावना ती शब्दात कधीच
मांडत नाही..
आणि तो ही बोलताना तिच्या डोळ्यात
कधीच बघत नाही..
असं न बोलताच ते एकमेकांना खूप समजून
घेतात.. जेव्हा आज ते
कधी कधी एकमेकांशी बोलतात.
दूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन ते
असं नेहमीच पाळतात.

खरं सांगायचं तर..

आज-काल मैत्री करायचीदेखील खूप
भीती वाटते।
कारण..
कुणाशी तरी आपल्याला ती, नकळतच
बांधून टाकते।
बांधलेले धागे मग, सहजासहजी तुटत
नाहीत।
भावनांचे पीळ त्या नात्यातले,
काही केल्या सुटत नाहीत।
सुटले पीळ तुटले धागे तरी,
ते जखमा देऊन जातात।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या,
ओलावा ठेवून जातात।
ओलावा त्या डोळ्यांतला,
लपवू पाहता लपत नाही।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब
खाली पडल्या वाचून राहत नाही।
आणि मग..!
का केली मैत्री ही अशी..?
हा प्रश्न मला सतावत राहतो।
पण, मी मात्र सदैव असाच,
मैत्री प्रत्येकाशी करत राहतो.।

देव पण न जाणो कोठून कसे
नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना
हृदयात स्थान
देतो.
ज्यांना कधी ओळखतही
नसतो.
त्यांना पार जीवाचे
जिवलग बनवतो..

मैत्री असावी मनामनाची,
मैत्री असावी जन्मोजन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी..

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते..

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची इवलीशी कुपी
..दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरिता असणारी तुझीचं साथ..
सोबत राहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे..
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे..

मैत्री हे नातंच, आहे जे कायम जपायचं असतं
एकमेकांच्या यशासाठी, आपलं सर्वस्व अर्पण करायचं असतं
जीवनाच्या या वाटेवर, तुझी माझी मैत्री जिवंत राहू दे
तुझ्या काही आठवणींवर माझाही हक्क राहू दे..

या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,
कळतं सारं काही, पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version