Home महामुंबई उच्च न्यायालयाचे सरकार, महापालिकेवर ताशेरे

उच्च न्यायालयाचे सरकार, महापालिकेवर ताशेरे

0
Mumbai Aug. 29 :- Mumbai is going to get sustained heavy rainfall. In pic water logging near Gandhi Market, King's Circle. ( pic by Ravindra Zende )

मुसळधार पावसाने अनेक मुंबईकरांनी आपले प्राण गमावल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने शनिवारी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

मुंबई- मुसळधार पावसाने अनेक मुंबईकरांनी आपले प्राण गमावल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने शनिवारी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना निसर्गाला आपण नियंत्रित करू शकत नाही. पण गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पावसाचा सामना करत असताना प्रशासनाने आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा केली नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत १२ इंच पाऊस झाला होता. या पावसाने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला.

डॉप्लर रडार यंत्रणा उभारण्याची मागणी
हायकोर्टात मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीश एन. एम. जमदार यावर सुनवाई करत आहेत. वकील अटलबिहारी दुबे यांच्यावतीने मागील वर्षी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत डॉप्लर रडार यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल व नागरिकांना आपला जीव गमवावा लागणार नाही.मुख्य न्यायाधीश म्हणाले, आपण निसर्गाला नियंत्रित करू शकत नाही. पण मुंबईत अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. खूप वर्षापासून पावसाळ्यात अशी स्थिती निर्माण होते पण आपण याबाबत १ इंचाचीही प्रगती केलेली नाही. सुनावणी दरम्यान वकिलांनी सांगितले की, एका वर्षात डॉप्लर रडार यंत्रणा उभारण्यासाठी कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. आता कोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिकेला गोरेगाव भागात सर्वे करण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

२९ ऑगस्टला झाली होती मुंबई ठप्प
मुंबईत २९ ऑगस्टला नऊ तासात तिनशे मिमी म्हणजेच ३० सेंटीमीटर किंवा १२ इंच म्हणता येईल इतका पाऊस झाला होता. शहराच्या अनेक भागात त्यामुळे पाणी साचले होते. याचा प्रभाव रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही पडला होता. रेल्वेसेवा तर जवळजवळ ठप्पच झाली होती. लो व्हिजिबिलिटीमुळे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही काळ उड्डाणेही थांबवावी लागली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने सरकारने कार्यालयाने सुट्टी दिली होती. शाळा आणि कॉलेजही दुस-या दिवशी बंद होते. यापूर्वी जुलै २००५ मध्ये असाच मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळीही हजारो लोक रात्रभर रस्त्यावरच होते. जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला होता. १२ वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबईत जवळपास तशीच स्थिती निर्माण झाली होती.

[EPSB]

मुंबई विद्यापीठातील ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या घोळामुळे रखडलेले निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version