Home देश फटाके विक्री बंदीच्या निर्णयाला धार्मिक रंग दिल्याने वेदना : सुप्रीम कोर्ट

फटाके विक्री बंदीच्या निर्णयाला धार्मिक रंग दिल्याने वेदना : सुप्रीम कोर्ट

0

दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर घातलेली बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारीही नकार दिला. आम्ही प्रदूषण टाळण्यासाठी फटाके विक्रीवर बंदी घातली.

नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर घातलेली बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारीही नकार दिला. आम्ही प्रदूषण टाळण्यासाठी फटाके विक्रीवर बंदी घातली. फटाके बंदीला धार्मिक रंग दिल्याबद्दलही न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.  फटाके विक्रीवर घातलेली बंदी उठविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. मात्र न्यायालयने स्पष्टपणे त्याला नकार दिला. बंदीचे समर्थन करताना न्यायालयाने म्हटले आहे की, प्रदुषणमुक्त शहर राहावे यासाठी ही बंीद घालण्यात आली आहे.

त्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता. मात्र या सगळ्या प्रकाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला. काही नेत्यांनी सोशल मीडियावर सुप्रीम कोर्टाने हिंदू विरोधी निर्णय दिला असल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या. या टीकेमुळे वेदना झाल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे. ज्या लोकांनी बंदी घालण्याआधी म्हणजेच ९ ऑक्टोबरच्या आधी फटाके विकत घेतले आहेत ते फटाके उडवू शकतात. दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर काय आहे ते आम्ही तपासणार आहोत असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

[EPSB]

भारतीय नागरिकांची युनिक ओळख असलेल्या ‘आधार’ कार्डने केंद्र सरकारच्या तिजोरीलाही भक्कम आर्थिक आधार दिल्याचे समोर आले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version