Home महामुंबई एलफिन्स्टन ब्रिजवरील ते दृश्य बघून मी थरथर कापत होतो: प्रत्यक्षदर्शी

एलफिन्स्टन ब्रिजवरील ते दृश्य बघून मी थरथर कापत होतो: प्रत्यक्षदर्शी

0

एलफिन्स्टनवरील दृश्य खूपच भयानक होते. काहींना गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. काहीजण मानसिक धक्का बसल्याने जागीच बसून होते.

मुंबई- एलफिन्स्टनवरील दृश्य खूपच भयानक होते. काहींना गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. काहीजण मानसिक धक्का बसल्याने जागीच बसून होते. काही जण बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडले होते. बघून मी अक्षरश: थरथर कापत होतो, ते दृश्य मला बघवत नव्हते आणि शेवटी मी तिथून ऑफिसला निघालो. एलफिन्स्टन स्टेशनजवळ एका कंपनीत काम करणारा धनंजय सहानी सांगत होता.

अंधेरीत राहणा-या २५ वर्षाच्या धनंजय सहानीचे एलफिन्स्टन येथील इंडिया बुल्सजवळ ऑफीस आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो एलफिन्स्टन रोडला येतो. शुक्रवारचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि थरकाप उडवणारा होता, असे धनंजयने सांगितले. दुर्घटना घडल्यानंतर काही क्षणातच धनंजय एलफिन्स्टन स्टेशनवर पोहोचला.

धनंजय म्हणतो, शुक्रवारी मला उशिरा जाग आली आणि मी नेहमीपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने एलफिन्स्टन स्टेशनवर पोहोचलो. मी ब्रिजवर जे चित्र बघितले ते खूपच भयानक होते. मी फार वेळ तिथे थांबू शकलो नाही एवढा मी अस्वस्थ झालो, असे त्याने सांगितले.

[EPSB]

म. रे. वरील अनेक पूल धोकादायक

परळ आणि एलफिन्स्टन या रेल्वे स्थानकांना जोडणा-या पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आता मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांवरील पुलांच्या अवस्थेचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version