Home टॉप स्टोरी ..तर साखर आयात करणार नाही!

..तर साखर आयात करणार नाही!

0

..तर साखर आयात करणार नाही!

नवी दिल्ली- साखरेचे दर ४५ रुपये किलोच्या आत राहणार असतील तर यावर्षी साखरेची आयात होऊ देणार नाही, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. साखर कारखानदारांच्या दिल्लीतल्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हे आश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गडकरी हे या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर होते. गडकरींचे भाषण  संपल्यानंतर पवारांनी हातात माईक घेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी हे आश्वासन दिले. ऊस उत्पादकतेच्या बाबतीत गुणवत्ता जपणा-यां देशभरातल्या विविध साखर कारखान्यांचा आज नॅशनल शुगर फेडरेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. देशात पुढच्या तीन वर्षात साखरेची गरज ३०० लाख टनाने वाढणार आहे, त्यामुळे नव्या आव्हानांसाठी साखर उद्योगाने तयार राहण्याची गरज शरद पवारांनी बोलून दाखवली.

उसाचे प्रती हेक्टरी उत्पादन, रिकव्हरी याबाबतीत जगातल्या देशांशी स्पर्धा करावी लागेल, असे शरद पवार म्हणाले. तर साखर उद्योगाने भविष्यात साखरेपासून डिटजर्ंट साबण, बांबूपासून सहवीजनिर्मिती या नव्या पयार्यांकडे वळलं पाहिजे, जेणेकरुन कारखाना वर्षभर चालू राहून त्याची क्षमता वाढेल, असे वक्तव्य नितीन गडकरींनी केले..

[EPSB]

नोटाबंदीच्या मुद्दय़ावरून भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version