Home विदेश डोनाल्ड ट्रम्प यांची वाटचाल आत्मघातकी मार्गावर सुरू

डोनाल्ड ट्रम्प यांची वाटचाल आत्मघातकी मार्गावर सुरू

0

हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे.

न्यूयॉर्क- हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग हो म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचा उल्लेख रॉकेटमॅन असा केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या दिशेने रॉकेट सोडणे अनिवार्य झाले होते. दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर आम्ही अणुऊर्जा निर्मिती करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर निर्बंध घातल्याने आमच्या भूमिकेत बदल होईल असे मानणे चुकीचे ठरेल.

शनिवारी अमेरिकी वायूसेनेची बी-१बी ही बॉम्बवाहू विमाने उत्तर कोरियाच्या पूर्व किना-यावरून घिरटय़ा घालून गेली होती. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी गुरुवारी उत्तर कोरियावर अधिकचे निर्बंध घातले होते.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला.

किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली. ‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे म्हटले होते.

[EPSB]

वागण्यात, बोलण्यात आणि राहणीमानात उच्च, नीच आणि मध्यम असे माणसाचे तीन वर्ग असतात. काही माणसे बोलण्यात फटकळ असतात.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version